डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडूज येथे बैठकीचे आयोजन

47

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.31मार्च):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त खटाव तालुक्यातील भिमसैनिकांची,आंबेडकर अनुयायांची बैठक वडुज येथे रविवार दि. 3-4-2022 रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजन केल्याचे खटाव तालुका रिपाई अध्यक्ष गणेश भोसले यांनी सांगितले.सदर बैठक ही जिल्हा परिषद गेस्ट हाऊस वडुज येथे आयोजित करण्यात आली असून. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचे असलेले निरबंधामुळे आणि शासनाने घालून दिलेल्या नियमावलीमुळे जयंती साजरी करण्यात आली नाही. यंदा मात्र शासनाकडून जयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सदर जयंती उत्सवाचे तालुका स्तरीय आयोजन करणेचे असून या बैठकीत जयंतीचे नियोजन आणि इतर बाबीवर चर्चा होणार आहे.तरी खटाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माणना-या भिमसैनिकांनी आणि अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.यावेळी जयंतीची उत्सव समिती तयार करण्यात येणार आहे. तसेच विविध पक्षातील पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध गावातील कार्यकर्ते जयंतीनिमित्त तालुक्यातील प्रत्येक गावातील भिमसैनिकांनी उपस्थित रहावे. असे गणेश भोसले यांनी सांगितले.