नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जदार सभासदांना शंभर टक्के कर्ज पुरवठा करावा

54

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.31मार्च):- जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जदार सभासदांना शंभर टक्के कर्ज पुरवठा करावा अशी मागणी भेंडाळी (निफाड) येथीलशेतकरीवर्गाने केली आहे.गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळामुळे शेतीमाल चे भाव कोलमडले होते त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झालेला आहे तरी या संकट काळात इतर राष्ट्रीय कृत बँक आज मी तिला कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहे तरी शेतकऱ्यांना एकमेव मार्ग व आधार म्हणून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे शेतकरी आज मोठ्या आशेने बघत आहे.

तरी जिल्हा मध्यवर्ती बँक आज पूर्ण कर्ज वाटप करत नाही तरी तो पुरवठा सुरळीत करून 100% कर्ज पुरवठा करवा ही तमाम निफाड तालुक्यातील शेतकरी बांधवांचे अडचण दूर करावी यासाठी भेंडाळी गाव येथील शेतकरी बांधव सोमनाथ रामकृष्ण इनधे संपत तात्या कमांनकर रामनाथ गंगाधर शिंदे लक्ष्मण भिका खालकर गणपत तात्या कमानकर आधी सह शेतकऱ्यांनी प्रशासनास विनंती केली आहे