माहिती विभागाचे आनंद नेवारे यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

84

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागपूर(दि.31मार्च):-संचालक माहिती व जनसंपर्क कार्यालयातील वाहनचालक आनंद नेवारे हे नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले. माहिती विभागात त्यांनी सुमारे 23 वर्षे प्रदीर्घ सेवा केली आहे. नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी समारंभात आज त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी श्री. नेवारे यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यात आला.

माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. श्री. नेवारे यांनी गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर संचालक कार्यालयांमध्ये वाहनचालक पदावर काम केले आहे.