सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष चोपडे सेवानिवृत्त

46

🔸परळी रेल्वे पोलीस स्टेशन मधे सपत्नीक सन्मान

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.1एप्रिल):-रेल्वे पोलीस प्रशासनात परळी रेल्वे पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेले सुभाष लिंबाजी चोपडे काल दिनांक ३१ मार्च रोजी सेवा निवृत्त झाले आहेत. परळी तालुक्यातील सिरसाळा गावचे ते रहिवासी आहेत. सेवानिवृत्ती बद्दल परळी रेल्वे पोलीस स्टेशन येथे चोपडे यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान स्टाफ च्या वतिने करण्यात आला.सन १९९० मध्ये सुभाष चोपडे रेल्वे पोलिस मध्ये पोलीस शिपाई पदी भरती झाले तेंव्हा पासुन ३२ वर्षाच्या सेवेत नागपूर, चाळीसगाव, नांदेड ते आजतागायत परळी रेल्वे पोलीस स्टेशन येथे त्यांनी काम पाहिले आहे.पोलीस शिपाई पासुन ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती झाली.

हसमुख व मनमिळाऊ स्वभावाचे चोपडे आपल्या सेवेत खुप कर्तव्यतत्पर होते. अंत्यत चोख पद्धतीने त्यांनी आपले कार्य केले आहे.एक निर्भीड तसेच सामाजिक जान असलेले रेल्वे पोलीस म्हणून त्यांची ओळख आहे. सेवानिवृत्त बद्दल रेल्वे पोलीस परळी स्टेशन च्या वतिने आयोजीत निरोप समारंभ कार्यक्रमात सहका-यांनी चोपडे यांच्या कार्याला उजाळा दिला.चोपडे यांनी ही आपल्या भाषणात सर्वांचे आभार व्यक्त केले,या वेळी सेवेतून निरोप घेतांना त्यांचे अंतकरण भरुन आले होते. यावेळी ठाणे प्रभारी अधिकारी परमेश्वर सोगे, सफी श्री अवचार, बडे, बाळासाहेब फड, मुकुंद पराळे, महादेव पवार, हेमलता नागपुरे, नवघरे, रोषणी मॅडम, वंदना मॅडम, मोहिणी मॅडम, पंकज पुरी, सातपुते, लक्ष्मण पवार, शहनवाज आदीसह सर्व स्टाफ उपस्थित होता. तसेच चोपडे यांच्या परिवारातील व्यक्ती उपस्थित होते.