जागृती महिला बचत गटाचा वर्धापनदिन उत्साहात

29

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.1एप्रिल):-मध्ये पन्हाळा तालुक्यातील माजगाव जागृती महिला बचत गट वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सोशल सर्कल फाउंडेशनच्या अध्यक्ष सुमित्रा भोसले पाटील होत्या तर मुक्त पत्रकार सुरेश माडकर, सुरेश राठोड व समाज रत्न पुरस्कार प्राप्त शशिकांत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला सक्षमीकरण व वर्क फॉर्म होम या दोन आगामी योजनेबद्दल माहिती दिली.यावेळी उपस्थित बचत गटाच्या महिला, माजगाव गावातील नागरिक व उपस्थित मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीत जागृती महिला संघाची व नंदिनी गारमेंट ची संपूर्ण माहिती, स्थापना, घर बसल्या काम, स्टॉल, स्पर्धा, निधी संकलनवेळेचे अनुभव सांगितले. यानंतर जागृती महिला मंचच्या सभासद महिलांनी सुंदर गाणे सादर केले.

नंदिनी गारमेंट च्या अध्यक्षा डॉ.सुमित्रा भोसले पाटील यांनी लकी ड्रॉ द्वारे एक शिलाई मशीन गिफ्ट केले. उपस्थित सर्व महिलांना वाहन म्हणून स्टील वाटी गिफ्ट देण्यात आले. या कार्यक्रमाला 350 पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे सुमित्रा मॅडमनी प्रत्येक महिलेला घर बसल्या काम देण्याचे आश्वासन दिले.यानंतर सरपंच शिवाजी पाटील यांचे भाऊ सदाशिव पाटील यांनी व्यासपीठावर बोलताना म्हणाले इथून पुढे भविष्यात महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक प्रकारे आम्ही जागृती महिला मंचला मदत करू.यावेळी पत्रकार सागर चौगुले, संभाजी खोत, अध्यक्षा अश्विनी चौगुले, सचिव रूपाली गोडसे, बँक सखी संगीता माने, विद्या चौगले, सपना पाटील, जयश्री हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा पाटील मॅडम यांनी केले.