सामाजिक उपक्रमातून मा. सुनिल भाऊ ठोसर यांचा वाढदिवस ७ एप्रिल रोजी सहारा बालग्राम येथे साजरा करण्यात येणार आहे

75

🔸सर्व मित्रपरिवार आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहावे :- युवा पत्रकार नवनाथ आडे

✒️गेवराई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

गेवराई(दि.2एप्रिल):- सर्व सामान्य जनतेला उपयुक्त होतील अशा सामाजिक उपक्रमातून मा. सुनील भाऊ ठोसर यांचा वाढदिवस सहारा बालग्राम येथे साजरा करण्यात येणार आहे. मित्र परिवार यांच्या वतीने हा विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वर्षी वाढदिवसाचा खर्च टाळून गोरगरिबांना अत्यावश्यक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करायचा आहे. असा निर्णय घेण्यात आला होता.

सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात अनेक काही अडचणी येत राहात असतात, अशा अडचणीच्या काळात मा. सुनिल भाऊ ठोसर यांनी त्यांच्या सोबत तत्पर सोबत घेऊन त्यांच्या अडचणी दूर करून आयुष्य सुखाने प्रस्थापित करून त्यांच्या अडचणीला ठाम लढा दिला. आणि अशा काही तळागाळातील गोरगरीब, दिव्यांग,वृध्दालोकांना, सर्वसाधारण प्रमाणे आजपर्यंत मदत करू सहकार्य करून आशिर्वाद पाठिशी घेऊन कार्य करीत राहिले..

याच आशिर्वादाने स्वतः चा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. कारण थाटामाटात जल्लोष करणे असे सर्व अटी रद्द करुन यामध्ये होणाऱ्या खर्चात आपण साधारणपणे वाढदिवस साजरा करून होणारा खर्च टाळून तो खर्च आपण सहारा बालग्राम, वृध्दाश्रम, येथे गरिब मुलांना, शालेय साहित्य, किराणा, कपडे, धान्य, अशा अनेक साहित्य वाटप करून खर्च करून सहारा बालग्राम येथे वाढदिवस साजरा करण्यात येणार असून…. सर्व मित्र परिवार, पदाधिकारी आपल्या आपल्या परिसरातील अनाथ मुलांसाठी, दिव्यांग शाळेत, गोशाळा येथे, वृद्ध आश्रम, निराधार आदी प्रकल्प येथे जाऊन आपल्या येथोपरी सहकार्य करावे माझी काही मदत लागल्यास माझ्या 9405799999 या नंबर वर एसएमएस करावे असे प्रतिपादन रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मा. सुनील ठोसर यांनी दिले आहे.

सोबत येताना अनाथ मुलांसाठी, शालेय साहित्य, किराणा,कपडे, खाद्य वस्तू , धान्य आपल्या परीने घेऊन यावे