रणमोचन येथील ग्रामपंचायत शिपाई पद भरणे हा केवळ स्वार्थीपणा…

27

🔸माजी उपसरपंच तारकेश्वर तोंडरे यांचा आरोप

🔹प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कायद्याचा अपमान करून बळजबरीने भरले पद..

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.2एप्रिल):-ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रणमोचन ग्रामपंचायत मध्ये सन 2015 -20 मध्ये कार्यरत असलेल्या सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सचिव यांच्या संगनमताने पदभरती घेण्या संदर्भात जाहीर नोटीस द्वारे घेण्यात आली. त्यामध्ये उच्चशिक्षित असो किंवा ग्रामपंचायतच्या त्यावेळच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या मतानुसार ही पद नियुक्ती घेण्यात आली होती त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांनी शिपाई पदाकरीता नामांकन दाखल केले होते . त्यापैकी प्रेमलाल श्रावण दोनाडकर याला पात्र ठरविण्यात आले होते तर चाहुल आनंदराव मेश्राम यांच्या गुणपत्रिका व टि.सी. मध्ये वाइट कलर मधून खोडतोड असल्यामुळे त्याला सदर पदाधिकारी अपात्र घोषित केले.

व पात्र म्हणून प्रेमलाल दोनाडकर यांना शिपाई पदावर निवड केली मात्र काही विरोधी गटात बसणाऱ्या तथाकथित पदाधिकाऱ्यांच्या विकृत राजकारणामुळे विरोधाभास करीत पदभरतीला गालबोट लावले शिवाय हे प्रकरण दोन्ही उमेदवारासाठी न्यायप्रविष्ट झाले मात्र त्यानंतर गावात विरोधकांची सत्ता आल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा न्याय पालिकेचा अपमान करून अपात्र ठरलेल्या चाहुल आनंदराव मेश्राम याला कोणतेही न्यायपालिकेचे आदेश नसताना सुद्धा रोजंनदारी तत्वावर नेमक्या कोणत्या कारणाने कायद्याचा अपमान करून त्याला परत शिपाई म्हणून तत्कालीन सरपंच,उपसरपंच, व ग्रामपंचायत सचिव, शिपाई म्हणून पूर्ववत केलेले आहे त्यामुळे गावातील सुशिक्षित उमेदवारांसह गावकऱ्यांनी या पदाबाबत आक्षेप घेतला असून पुन्हा नव्याने पदभरती घेण्यात यावी तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दोषींवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी रणमोचन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तारकेश्वर तोंडरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे

—–
“मी एकट्यीने घेतलेला हा निर्णय नसून ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व काही सदस्यांनी ठरविल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शेवटी कोणत्यातरी व्यक्तीची रोजंदारी तत्त्वावर शिपायाची भरती करणे आवश्यक होती. सदर व्यक्ती रोजनंदारी पद्धतीने कार्यरत असून तो ग्रामपंचायत मध्ये अद्यापही कायमस्वरूपी नाही”- मनीषा महाकाळकर (ग्रामसेवक ग्रां.पं. रणमोचन)