तलवाडा येथे साई संस्थानच्या वतीने शिवाजी चौकात पाणपोईची व्येवस्था

30

🔸मताचा जोगवा मागणा-या नेते व कार्यकर्त्यांना पडला विसर

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.4एप्रिल):-तालुक्यातील तलवाडा येथे प्रतिवर्षा प्रमाणे श्री साईबाबा संस्थान तलवाडाचे मुख्य प्रवर्तक श्री रामभाऊ कंगनवाल यांच्या संकल्पनेतुन ऊन्हाळ्याची चाहुल लागताच वाटसरुन साठी पिण्याच्या पाण्याची सोयीनुसार पाणपोईची व्येवस्था करण्यात आली असुन वाटसरु नागरिकातुन समाधान व्येक्त केल्या जात असुन निवडनुकीसाठी मताचा जोगवा मागणा-या नेते व कार्यकर्त्यांना विसर पडल्याची चर्चा या निमित्ताने एैकन्यास मिळत आहे.

श्री साईबाबा संस्थान तलवाडा येथील साईबाबा मंदिर परिसर हा शिवाजी महाराज चौकातील मुख्य डांबरी रस्त्या लगट आसल्याने वाटसरुंची मोठ्या प्रमाणात वर्दळ या ठिकाणी कायम पाहण्यास मिळत असुन ऊन्हाच्या तिर्वतेने व्याकुळ होत आसलेल्या वाटसरुंना या पाणपोई मुळे थंड पाणी पिण्यास मिळत असल्याने नागरिकातुन समाधान व्येक्त केल्या जात असुन या ठिकाणी दर रोज पाणी व्येवस्था कामी बळीराम़ वाघमारे, गोरख लव्हाळे, पत्रकार शेख आतिखभाई, किशोर हजारे, हे सहकार्य करत असुन या पाणपोई उदघाटन प्रसंगी पत्रकार तुळशीराम वाघमारे, विष्णु राठोड, रावसाहेब मुद़ळ, तुकाराम काळे, विश्वास गावते उपस्थित होते.