कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

26

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.4एप्रिल):-दिनांक २६ व २७ मार्च २०२२ रोजी तालुका क्रिडा संकुल बारामती जिल्हा पुणे येथे कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या वतीने राज्यस्तरीय कराटे प्रतियोगिता घेण्यात आली.
या स्पर्धेत २४ जिल्ह्यातील एकूण ७३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शरमिलाताई पवार अध्यक्षा शरयू फाउंडेशन बारामती, पुणे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, तांबोळी सर, विक्रम निंबाळकर रियाज शेख व स्पोर्ट्स कराटे वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष परमजित सिंग, कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सर्व पदाधिकारी व शरयू फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांनी ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पहा, लवकरच कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ची मान्यता मिळणार असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष शर्मीलाताई पवार यांनी केले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या जिल्हा मुळे MOA ची मान्यता मिळण्यास मदत होईल कारण आपल्या संघटनेसोबत किती जिल्हे आहे हे यावरून कळाले असे वक्तव्य प्रांताधिकारी बाबासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले. लवकरच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यासोबत MOA ची मान्यता मिळण्याबाबत चर्चा करून कागदपत्रांची पूर्तता करू असे मार्गदर्शन मुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कराटे खेळाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून सदर स्पर्धेचे आयोजन केल्याचे कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सचिव श्री रवींद्र कराळे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले. महाराष्ट्रातील जुन्या संघटनेने कराटेतील खेळाडूचे भले करण्याचा मानस ठेवला नाही असे मत प्रास्ताविक भाषणातून कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे पदाधिकारी सेंसेई विनय बोढे यांनी तर महाराष्ट्रात कराटे करिता मजबूत संघटना म्हणून कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ला MOA ची मान्यता मिळवून द्यावी अशी विनंती सुरेश मिरकर यांनी केली. कराटे हा क्रिकेट नंतरचा सर्वात मोठा खेळ आहे तरीही त्याला महाराष्ट्रात वाव नाही अशी खंत यासीन झांबरे यांनी व्यक्त केली. मला पदाची लालसा नाही नेहमीच खेळाडूच्या हितासाठी झटत राहिलो पण माझे प्रयत्न कराटे तील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सफल होऊ दिले नाही, मी आता थकलो आहे, तुम्ही नवीन दमाचे लोक आहेत तुम्ही आता लढा माझे समर्थन आहे असे प्रतिपादन सेन्सेई परामजीत सिंग यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अभिमन्यू इंगळे यांनी केले तर स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सर्व जिल्हा प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.