?शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर घनासावंगी तालुका भाजपा च्या वतीने तहसीलदारांंना निवेदन

  41

  ?तिर्थपुरी येथे घनासावंगी तालुका भाजपा च्या वतीने सर्व बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना पीककर्ज वाटप विषयी निवेदने सादर

  ✒️जालना(अतुल उनवणे, जिल्हा प्रतिनिधी)

  जालना(दि-27 जून)केंद्रीय राज्यमंत्रीरावसाहेब पाटील दानवे, माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर ,भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष पाटील दानवे, व माजी आमदार विलासबापू खरात पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व नेतृत्वामध्ये घनसावंगी विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात घनासावंगी तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

  सोबतच तीर्थपुरी येथील सर्व बँकेचे व्यवस्थापक यांनाही शेतकऱ्यांच्या पिककर्ज विषयक अडचणी संदर्भात रीतसर लोकशाही मार्गाने निवेदने देण्यात आली.बँक व्यवस्थापन यांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की कोणताही विलंब न लावता त्वरित शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करण्यात यावे व दलालांचा असणारा हस्तक्षेप थांबवावा, शेतकऱ्यांना देण्यात येणारी दुय्यम वागणूक थांबवावी व सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी,मागील पिककर्ज थकीत असेल तरी पण सध्याच्या कोवीड 19मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे थकीत खाते चे कर्ज माफी करून नवीन कर्ज विना अट तत्काळ वाटप करावे, इत्यादी मागण्या निवेदनात आहे.

  तहसीलदार घनासावंगी यांना दिलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील सर्व बँकांची एकत्रित बैठक बोलावून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज देण्यासंदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी,तालुक्यातील बोगस बियाणे मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी,शेतकऱ्यांना व शेती पिकांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना संरक्षण मिळण्यासाठी बंदिस्त तार कंपाउंड वॉल साठी 90 टक्के सबसिडी देण्यात यावी, शेतकऱ्यांना मागेल ते खत,बियाणे व औषधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात द्यावी, तालुक्यातील घरात राहिलेला शेतकऱ्याचा कापूस तात्काळ खरेदी करण्यात यावा,तालुक्यातील 2019 मध्ये अतिवृष्टीच्या पावसामूळ झालेले नुकसान चे अनुदान काही गावांना संपूर्ण अनुदान बाकी आहे आणि काही गावात फळबाग अनुदान बाकी आहे निधी उपलब्ध करून ते तात्काळ वाटप करावे,पंतप्रधान सन्मान निधी योजनेतील वंचित शेतकऱ्यांना लवकर लाभ देण्यात यावा,कोवीड 19 मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पान टपरी चालक, हॉटेल व्यवसायिक, सलून चालक , रस्त्यावरील पानपुरी वडापाववाले, लॉन्ड्री चालक,
  रस्त्यावर कोणत्याच संकटाची तमा न बाळगता चप्पल बूट शिवून आपल्या परिवाराची पोटाची खळगी भरणारा गटई काम करणारा चर्मकार समाज हातावर पोट भरणारा कामगार मजूरवर्ग यांच्यासह रस्त्यावरील छोट्या व्यवसायिकांना आर्थिक मदत द्यावी, तीन महिन्याचे घरगुती लाईट बिल माफ करण्यात यावे,बिगर राशन कार्ड धारकांना तात्काल राशन देण्यात यावा  
  शेतकऱ्याचे सर्वच प्रश्न महत्वाचे असून सध्या कोरोना व्हायरसचे संकट जगावर आहे अशा स्थितीत देशात बाकीचे उद्योग डबघाईला आले आहेत , फक्त शेती हा एकमेव उद्योग आपल्याला व देशाला सावरू शकतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकर्‍यांना आत्महत्येपासून वाचायचे असेल तर तरी माननीय साहेबांनी शासन दरबारातून आमच्या मागणीचा विशेष अधिकार वापरून शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य असे भाजपच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
                यावेळी शिवाजीराव बोबडे पाटील(तालुकाअध्यक्ष भाजपा घनासावंगी) ,देवनाथजी जाधव(माजी जि.प सदस्य),अंकुशरावजी बोबडे(रो.ह.यो.तालूका अध्यक्ष घनासावंगी),संजयजी तौर (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा जालना जि.),अशोक राजे जाधव, योगेश देशमुख,विष्णू जाधव,तात्यासाहेब चिमणे,प्रताप कंटुले, जुगल किशोर चांडक,
  भरत परदेशी,अण्णा पाटील बोबडे,शेषनारायण मापारी,लक्ष्मण खंडागळे, भरत उगले, सुभाषराव देवडे,संभाजीराव घोगरे,
  तात्यासाहेब चिमणे,दिगंबर चिमणे,गणेश गवते, रामेश्वर गरड,भाऊसाहेब देवडे, दत्तापाटील चिमणे,रवि बोबडे, विकास मुकणे,किशोर गिराम, सिद्धेश्वर भानुसे,लक्ष्मण मोटे, बबन शिंदे,आदी भाजपा कार्यकर्ते व शेतकरीयांच्या सह्या व उपस्थित होते.