4तलवाडा शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या संबंधित विभागाकडे दिले निवेदन

30

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि 9एप्रिल):- महावितरणने वाढत्या ऊन्हाची त्रीवता व रमजानच्या महिन्याचे पावित्र्य, सह तलवाडा येथील जागृत देवस्थान आई त्वरितादेवी यात्रा उत्सव लक्षात घेऊन तलवाडा व परिसरातील लोडशीडींग बंद करावी आस्या अशयाचे निवेदन तलवाडा गावक-यांच्या वतीने महावितरणच्या संबंधित विभागाकडे शिवसेना युवा सर्कल प्रमुख शेख रफिकभाई, शिवसेना गट नेते गोविंद प्रसाद जोशी यांनी दिले आहे . महावितरणला दिलेल्या निवेदनात विषेश विनंती करण्यात आली आहे कि मोजे तलवाडा व परिसरातील वयोवृद्ध महिला पुरुष व लहान बालक ऊन्हाच्या त्रीवतेने कासवीस होऊन लह्या लह्या करत असुन पवित्र रमजान महिना दिनांक ३ / ४ / २०२२ पासुन सुरु झाला आसल्याने ऊपवासात कासाविस होणा – या जिवाचे विचार करुन पवित्र रमजान महिना व त्वरितादेवी यात्रा उत्सवचा माफक विचार करुन लोडशीडींग बंद करण्यात यावी ,

उपवासाची सुरूवात व उपवास ठेवण्यासाठी सकाळी चार वाजल्यापासुन उठवून महिलांना स्वयंपाक करावा लागत आहे व नमाज पठन करावे लागत आहे. तरी मा. साहेबांनी रमजानच्या एक महिन्यासाठी व यात्रा उत्सव साठी लोडशीडीग करू नये . आशी विनंती वजा मागणी तलवाडा शिवसेना युवा सर्कल प्रमुख शेख रफिकभाई, शिवसेना गट नेते गोविंदप्रसाद जोशी, देवा मुदळ, मदन करडे,कदिर खतिब,शेख शफीक, शेख शेरु, शेख राजु, बंटी भांबरे, सह गावक – यांनी केली