भाकपची नांदगाव खंडेश्वर येथे इंधन दरवाढ व महागाई विरोधात तीव्र निदर्शने

28

🔹राष्ट्रीय सचिव कॉ.भालचंद्र कांगो यांची प्रमुख उपस्थिती

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.10एप्रिल):-दि. ९ एप्रील२०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता बसस्थानक परिसर नांदगाव खंडेश्वर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस व वाढत्या महागाई विरुद्ध तीव्र निदर्शने करण्यात आली.पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमती तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात दि. ४ एप्रील ते १० एप्रील २०२२ दरम्यान संपुर्ण सप्ताहभर सर्वत्र निदर्शने, धरणे आंदोलन करण्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कमेटीने आवाहन केले आहे .मागील १५ दिवसांपासुन पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. प्रचंड प्रमाणात होत असलेल्या इंधनांच्या दरवाढीचा परिणाम सर्वच वस्तुंच्या भाववाढीवर होत आहे. मोदी सरकारने केलेली दरवाढ त्वरीत कमी करावी, म्हणून जनतेच्या सहभागासह आंदोलन करण्याचे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलेले आहे.

या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका कौन्सिल नांदगाव खंडेश्वर च्या वतीने शनिवार, दि .९ एप्रील २०२२ रोजी सायंकाळी ठीक ४.३० वाजता बसस्थानक परिसर नांदगाव खंडेश्वर येथे ” तीव्र निदर्शने ” करण्यात आली.पक्ष आणि जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी, शेतकरी, मजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला, सामान्यजन बहुसंख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

या आंदोलनात प्रामुख्याने भाकपचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड भालचंद्र कानगो, राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे अमरावती विभागीय निमंत्रक संजय मंडवधरे,जिल्हा सचिव कॉ. सुनिल मेटकर, तालुका सचिव,कॉ. संतोष सुरजूसे, सहसचिव विनोद तरेकर, माजी पं.स. सदस्य गणेश अवझाडे, सचिन मेटकर गजानन सुलताने,प्रदीप काळमेंघ, विनोद वैदय आशिष जुनघरे ,हरिदास राजगिरे,भानुदास मंदुरकर,उपसरपंच ओमप्रकाश सावळे,संतोष बागडे, इसराइल शहा,समशेरखा पठाण, पुरुषोत्तम टापरे,विजय मंडवधरे, मंगेश गुल्हाने, रामदास लांजेवार, सतीश शिंदे, हनुमान शिंदे,मोरेश्वर वंजारी,संतोष खडसे,प्रफुल देशमुख, वासुदेव चौधरी, जया मंडवधरे, दिक्षिता तरेकर,वेदिका मरगळे,योगेश अवझाडे, योगेश कणसे, अविनाश कणसे, माधव ढोके, सुहास चौधरी,महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे बाबाराव इंगळे, उपसरपंच विनोद गोंडाणे,लिलाबाई उपरीकर, महादेव शेंडे, भोपतराव सोनवने, राधाबाई सळसळे,गोमाजी मेश्राम,फकिरा खडसे,लिलिबाई भोयर, पंचफुला शिंदे, इंदिरा शेंडे, शेवंता गोंडाणे, सुनिता शेंडे, सुरेखा खडसे, उषा सोनोने,पुनम खंगार, बेबी केवट, रूखमा उके,जया केवट,रेखा मेश्राम, रंजना मेश्रा,बेबी मेश्राम, वर्षा खंगार यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा,अखिल भारतीय नौजवान सभा (AIYF),ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF), लाल बावटा शेतमजूर युनियन, भारतीय महिला फेडरेशन, असंघटित बांधकाम कामगार संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.