जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ विनोदी कवी अशोक नायगावकर यांची ७ व्या महाकाव्यसंमेलनाध्यक्ष पदी निवड

32

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.10एप्रिल):-नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय,भोसरी,पुणे व सह्याद्री युथ फांऊडेशन,महाराष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलन २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.दि.१४ व दि.१५ मे २०२२ रोजी कवितेची राजधानी पिंपरी चिंचवड येथिल आचार्य अञे रंगमंदिर,संत तुकाराम नगर,पिंपरी,पुणे १८ येथे मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे.या महाकाव्यसंमेलनात सर्वांना मुक्तप्रवेश आहे.

महाकाव्यसंमेलनाचे महाकाव्यसंमेलनाध्यक्ष ज्येष्ठ जागतिक कीर्तीचे विनोदी कवी अशोक नायगावकर यांची संस्थेच्या वतीने एक मताने निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल कवी अशोक नायगावकर यांनी आनंद व्यक्त केला ते या प्रसंगी म्हणाले की,”गेली सहा महाकाव्यसंमेलन उत्तम यापुर्वी आयोजन करुन संपन्न केलेले आहे.महान कवींनी या महाकाव्यसंमेलनाचे अध्यक्ष पद स्विकारुन संस्थेच्या कार्याचा गौरव केलेला आहे.मला या सातव्या अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवडकेल्याबद्दल संस्थेचा मी आभारी आहे. त्यांच्या संयोजनासाठी,संपन्नतेसाठी माझ्या शुभेच्छा.हे महाकाव्यसंमेलन उत्तमप्रकारे यशस्वी होणार आहे.कवींना समाजाला जपले पाहीजे.कवितेतून समाजप्रबोधन होत असते.अशी भावना व्यक्त केली.”