पद्युत्तर विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12एप्रिल):-येथील नेवजाबाई हितकरिणी महाविद्यालयातील पद्युत्तर विभागाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.लालजी मैद प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रशांत राऊत,प्रा माधव चुटे, प्रा.अतुल अंबादे,प्रा.नवघडे मॅडम,प्रा.अस्मिता कोटेवार उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला प्रा.निकोडे मॅडम,प्रा.चौधरी मॅडम, प्रा सुंदरकर,प्रा.शेंदरे मॅडम,प्रा.रुमाकांत तुंबडे,प्रा.संदीप ठेंगरे,प्रद्युत्तर विभागाचे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमानिमित्य प्रा.प्रशांत राऊत,प्रा.माधव चुटे, ,प्रा.कोटेवार,प्रा.नवघडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना उद्भोदित केले.तर अध्यक्षीय भाषणात प्रा.बालाजी मैद यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना त्यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाचा लावलेला रोपटे आज वटवृक्षाच्या रूपाने विद्यार्थ्यांच्या स्वरूपात समाजात पसरला असून आज प्रत्येक क्षेत्रात मुलींनी अग्रगण्य स्थान निर्माण केले आहे ते फक्त ज्योतिबा फुलेंच्या श्रमामुळेच त्यामुळे त्यांच्या श्रमाचे आजच्या विद्यार्थ्यांनी भान ठेवून शिक्षणाचा उपयोग समाजकार्यासाठी करावा असे मौलिक मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नाजूक देशमुख हिने केले तर आभार प्रिया बवनवाडे हिने केले.