माळी समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन व व्याख्यान संपन्न !

28

🔹तलवारीच्या धारी पेक्षा कलमची धार श्रेष्ठ – गोपाल दर्जी

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.13एप्रिल):- येथील श्री संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त ” सावित्रीमाई फुले अभ्यासिका ” व ” प्रबोधनपर व्याख्यानाचे ” आयोजन करण्यात आले.या ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी करून दिला.या संयुक्तिक जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी होते.

प्रमुख वक्ते म्हणून जळगाव येथील दर्जी फाऊंडेशनचे संचालक गोपाल दर्जी सर होते. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संजय महाजन, माळी समाज अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निंबाजी महाजन, सुकदेव महाजन, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, उषाताई वाघ, सुरेखाताई महाजन, कैलास माळी, विश्वस्त विजय महाजन, माजी सचिव दशरथ महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, सहसचिव दिगंबर महाजन, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, कैलास पवार, सुधाकर मोरे, महादू अहिरे, लक्ष्मणराव पाटील, पी.डी.पाटील, हेमंत माळी, गोरख देशमुख, गौतम गजरे, निलेश सोमनाथ महाजन, सतिष शिंदे, गोपाल आण्णा माळी, आनंद पाटील, समाधान वाघ, राहुल रोकडे, मयुर भामरे, नगर मोमीन, पूनमचंद बाविस्कर, पत्रकार रविंद्र महाजन, विनोद रोकडे, बाळासाहेब जाधव, निलेश पवार, महेंद्र तायडे, आदींची उपस्थिती होती.

सर्वप्रथम व्याख्यानाचे प्रमुख वक्ते गोपाल दर्जी व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले अभ्यासिकेचे फीत कापुन उद्घाटन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

प्रमुख वक्ते श्री.दर्जी यांनी महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक – शैक्षणिक कार्य सांगून या महामानवांचे विचारच आपल्याला तारतील, तलवारीच्या धारी पेक्षा कलमची धार श्रेष्ठ असते, आपल्या समाजात मंदिर – मस्जिद- गुरुद्वारा – चर्च उभारण्यापेक्षा विद्यालय स्थापन करणे गरजेचे आहे. असे विविध उदाहरण देऊन तरुणांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगून, उच्चपदस्थ अधिकारी बनण्याचे स्वप्न पहा आणि आपले ध्येय पूर्ण करा यासाठी दिवस – रात्र अभ्यास करून आपण आपले ध्येय गाठा. शिक्षण ही उद्धाराची जननी आहे. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर हेच आपले आदर्श आहेत. असे प्रतिपादन श्री. दर्जी यांनी उपस्थितांना केले. सूत्रसंचालन गोपाल माळी यांनी तर आभार व्ही.टी.माळी यांनी मानले.