शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महात्मा फुले जयंती संपन्न

70

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.13एप्रिल):-महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम यांनी केले.

याप्रसंगी ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनावर प्रकाश टाकत उपस्थित गटनिदेशक बंडोपंत बोढेकर, आनंद मधुपवार यांनी समयोचित विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कुर्झेकर यांनी केले तर आभार मिना गांगरेड्डीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व निदेशकांनी व रासेयो च्या स्वयं सेवकांनी परिश्रम घेतले