प्रबोधन चळवळीचा अनुबंध जोडणारा ग्रंथ – डॉ. दत्तात्रय डांगे

36

✒️सचिन सरतापे(प्रतिनीधी,म्हसवड)मो:-907568610

म्हसवड(दि.21एप्रिल):-सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोडून गेल्या दोनशे वर्षाच्या प्रबोधन चळवळीवर भाष्य करणारा प्रबोधनवादी चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा हा ग्रंथ आहे. असे प्रतिपादन येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले. ते महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त कोल्हापूर येथील परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत व महावीर महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. शरद गायकवाड लिखित प्रबोधनवादी चळवळीतील मातंगाची शौर्यगाथा या पुस्तकावर समता फौंडेशन च्या वतीने आयोजित चर्चासत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत बा. ना. धांडोरे होते.

डॉ. डांगे म्हणाले की, अत्यंत साध्या सरळ सहज सुलभ भाषेतील हा ग्रंथ प्रत्येक परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्याने वाचायला हवा. उच्चभ्रुंची संस्कृत भाषे संबधित मिरासदारी मोडून लढणाऱ्या मातंग समाजातील संस्कृत पंडितांचा जीवनपट मातंगाची शौर्यगाथा या ग्रंथात अधोरेखित केलेला आहे.प्रा. बालाजी वाघमोडे म्हणाले, मातंगाची शौर्यगाथा या ग्रंथाला फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी लाभलेली आहे. अत्यंत रोमांचकारी घटना प्रसंगांनी परिपूर्ण असा हा संदर्भ ग्रंथ बहुजन समाजाच्या डोळ्यात प्रबोधनाचे अंजन घालण्याचे काम करतो आहे. रस्त्यावरच्या चळवळीला वैचारिक, बौद्धिक खुराक देण्याचे काम या ग्रंथाने केलेले आहे.

अमरजित पाटील म्हणाले की, आंबेडकरी चळवळीला दिशादर्शक, मार्गदर्शक ठरणारा ग्रंथ आणि प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, निष्ठावंतपणा ही मातंग समाजातील महानायकांची स्वभाव वैशिष्ट्ये मातंगाची शौर्यगाथा या ग्रंथातून सप्रमाण स्पष्ट होतात.

मंगळवेढा पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे म्हणाले की, सत्यशोधक चळवळ, आंबेडकरी चळवळीच्या वेगवेगळ्या टप्प्यातील अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिलेल्या परंतु इतिहासाच्या पानावर अजिबात नोंद नसलेल्या सर्वांगिण परिपूर्ण संशोधन ग्रंथ म्हणजे हा ग्रंथ होय.कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा. डॉ. धनंजय साठे म्हणाले की, वंचितांचा समृद्ध इतिहास या ग्रंथातून मांडला गेला आहे. आंबेडकरीला चळवळी दिशादर्शन करेल. इतक्या वाड.मयीन क्षमतेचा हा ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ आहे.अध्यक्ष बा. ना. धांडोरे म्हणाले की, साहित्य, समाज आणि संकृती यांचे अतूट नात अधिक विकसित करण्याचे ऐतिहासिक काम या ग्रंथाने केलेले आहे. मनुवादी व्यवस्था महापुरुषांचे आणि इतिहासाचे जे विकृतीकरण करते आहे. त्याचे आव्हान पेलण्याचे महत्वाचे कार्य डॉ. शरद गायकवाड यांच्या मातंगाची शौर्यगाथा या ग्रंथाने केलेले आहे.यावेळी लेखक डॉ. शरद गायकवाडयांनी ग्रंथ लेखना मागची भूमिका मनोगतात मांडली.

स्वगत व प्रास्ताविक डॉ. बापू चंदनशिवे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुनील अडगळे यांनी केले तर आभार दत्तात्रय कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमास नानासाहेब वाघमारे, बी. आर. भोसले, दिलीप देवकुळे श्रीकांत कसबे, रमेश कांबळे, युवराज पवार, जयसिंग मस्के, सुनील रणदिवे, डॉ. प्रा. नागिण सर्वगोड, डॉ.नितीन रणदिवे, डॉ. शैलेंद्र सोनवणे, बादल यादव, सुनील वाघमारे, भालचंद्र कांबळे, अमोल पाटोळे, वैभव रणदिवे, निवास सातपुते, विपुल सातपुते, प्रा. अनिल लोखंडे, चंद्रकात हुलगे, शिवाजी देवकते, आदी उपस्थित होते.