आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनानिमित्त व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम प्रश्नमंजुषा, वृक्षारोपण आणि रॅली द्वारा जनजागृती

✒️औरंगाबाद(पुरोगामी न्युज नेटवर्क)

औरंगाबाद(दि.22एप्रिल):-भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद तर्फे जनजागृती कार्यक्रम संपन्न औरंगाबाद – भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद आणि राजमाता जिजाऊ महाविद्यालय, घोडेगाव, तालुका-खुलताबाद, जिल्हा-औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ महाविद्यालय येथे आज दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनाच्या निमित्ताने विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व साई सेवा बहुविध प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, साईनाथ जाधव, गोळेगावचे सरपंच व लोकमत सरपंच अवार्ड 2018 चे मानकरी, संतोष जोशी, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख, पंचायत समिती, खुलताबादचे कृषी अधिकारी, अशोक खेडेकर, आरोग्य विभागाच्या समन्वयक, तेजस्विनी तुपसागर, पंचायत समिती, खुलताबादचे स्वच्छता समन्वयक, आर एस दांडेकर, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय आणि सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी विद्येची देवी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींचे स्वागत रोप व पुस्तक देऊन करण्यात आले.

यावेळी आर एस दांडेकर यांनी स्वच्छता, तेजस्विनी तुपसागर यांनी योग, आयुष व आरोग्य, अशोक खेडेकर, संतोष जोशी यांनी पाण्याचे महत्व-पाण्याचे नियोजन, वसुंधरा संवर्धन, वन संवर्धन आदी विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख व अध्यक्षिय मार्गदर्शन साईनाथ जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या आधी केंद्र शासनाचे पंजीकृत कलापथक मीरा उमप आणि पार्टी, औरंगाबाद यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे पाण्याचे महत्व-पाण्याचे नियोजन, वसुंधरा संवर्धन, वन संवर्धन आदी संदर्भात जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ठाकूर मैडम व आभार प्रदर्शन प्रदीप पवार यांनी केले.

कार्यक्रम समाप्ती नंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व जनजागृती रॅली काढण्यात आली. जनजागृती रॅली मध्ये राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय आणि सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी जागतिक वसुंधरा दिन, पर्यावरण, पाण्याचे महत्व आदी विषयांवर प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. विजेते स्पर्धक – वैष्णवी जाधव, भक्ती व्यवहारे, विशाल पवार, समीक्षा जाधव, भाग्यश्री गोरे, प्रतीक्षा पाडळे, अक्षय गोरे, यश जाधव, पूनम गोरे, सुमिथ बोधले यांना क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद तर्फे पुरस्कार व न्यू इंडिया समाचार – जल सुशासन पुस्तक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात संतोष जोशी यांनी वसुंधरा संवर्धनाची सर्वांना शपथ दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED