वडा व चिंचोली रेतीघाटात हजारो ब्रास वाळू चोरी

30

🔹अखेर वाळू तस्करी कोणाच्या आशीर्वादाने होत आहे?

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

वडा(दि.23एप्रिल):- रेतीघाटाला चांगलीच चपराक बसली आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही, त्यामुळे पांढरकवडा व वडा गावात वाळू तस्कर पुरेपूर फायदा उठवत आहेत.परंतु दुसऱ्याच दिवशी जैसे थे परिस्थिती दिसून येत आहे.घुग्घुस शहरांतर्गत येणाऱ्या रेतीघाट, चिचोली, तामसी, कोची, पिपरी आदी बरेच गावांचीही जवळपास अशीच परिस्थिती असून या सर्व घाटाखाली येणाऱ्या गावांतील वाळू माफियांनी कोट्यवधी रुपयांची वाळू पचवली असून, वाळूमाफियांची हीच स्थिती आहे. निर्भयपणे वाळू चोरी करताना दिसले.येत आहेत.काळोखात वाळूची चोरी अव्याहतपणे सुरू आहे.गावातील नागरिकांशी विचारपूस केली असता पांढरकवडा व वडाचे 3 ते 4 तस्कर रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे दररोज वाळू चोरी करतात असे ग्रामस्थांनी सांगितले.

तर दुसरीकडे घुग्घुस व नकोडा येथील वाळू तस्कर रात्रीच्या वेळी चिचोली रेतीघाट येथे वाळू चोरी करताना दिसले, जे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.जिल्हा प्रशासन या वाळू माफियांवर कडक कारवाई करणार का?की ही वाळू अशीच अव्याहतपणे सुरू राहणार?या वाळू माफियांना जबाबदार कोण?कोणाच्या आशीर्वादाने ही वाळू तस्करी यशस्वीपणे सुरू आहे? याठिकाणी नियंत्रण न राहिल्यास लवकरच हे तस्कर जनतेसमोर धक्कादायक बाबी उघड होतील ?.