प्रितमताई मुंढे.. दबंग खासदार नव्हे ..तर संवेदनशील सुसंस्कृत खासदार. :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

29

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि23एप्रिल):-सध्या ईलेक्ट्रीक आणि सोशल मिडीयावर खासदार प्रितमताई मुंढे यांनी किती खासदार फंड खर्च केला तर दमडीही नाही अशी ब्रेकींग न्युज चालवली जात असून विरोधक आणि त्यांचे वाॅटस अप विद्यापीठ त्यांच्यावर टीकेचा भडिमार करताना आसुरी आनंद घेताना दिसतात त्याचवेळी प्रितमताई यांचे समर्थक सदसद्विवेक बुद्धीने विचार न करताच काहीही असो आमच्या ताई दबंगच या मुद्द्यावर अडुण आहेत, त्यातच प्रितमताई यांनी स्वतः पुढे होऊन माझा निधी कोरोना कालावधीत कोरोनाबाधितांसाठी देण्यात यावा अशी सुचना मीच सभागृहात मांडली होती हे सांगताना दिसतात. अथवा कामे सुचवले असुन देयके अदा करण्यास जाणीवपुर्वक अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप केलाय…..

आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून पाहिलेल्या खा. प्रितमताई मुंढे या संवेदनशील आणि सुसंस्कृत खासदार, नुकताच आलेला अनुभव म्हणजे दि.१८ एप्रिल २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार आणि गेवराई तालुक्यातील गढी येथील डाॅ. संभाजी पवार आणि डाॅ.सुनिता पवार दांमपत्यावर दवाखान्यात घुसुन झालेल्या हल्ल्यासंदर्भात त्यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात गेलो असता त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आणि घटना सांगितल्यानंतर खा. प्रितमताई मुंढे यांनी लागलीच प्रभारी पोलीस अधिक्षक बीड सुनिल लांजेवार यांना फोनवरून महिला डाॅक्टरवर हल्ला ही बीड जिल्ह्य़ातील प्रथमच घडणारी लाजिरवाणी घटना असून वैद्यकीय व्यवसायिकांवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या संरक्षणार्थ महाराष्ट्र शासनाने बनवलेल्या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशा सुचना दिल्या. डाॅ.सुनिता पवार यांना धीर दिला..त्यानंतर आम्ही पोलीस अधिक्षक कार्यालयात सुनिल लांजेवार यांना भेटलो असता खासदार.प्रितमताई यांनी फोनवरून सविस्तर कल्पना दिली असून त्यानुसार हल्लेखोरांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले….त्यामुळेच आम्हा सामाजिक कार्यकर्त्याच्या दृष्टिकोणातुन खा. प्रितमताई मुंढे या दबंग नव्हे तर संवेदनशील आणि सुसंस्कृत खासदार आहेत याविषयी आम्हाला निश्चितच आनंद आहे..