बीड जिल्ह्यामध्ये कर्जबाजारी पणाला कंटाळून 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

32

🔸गेवराई तालुक्यातील एक तर बीड वरवटी येथील घटना

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.24एप्रिल):- जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. बीडच्या वरवटी येथील एका 50 वर्षीय अल्प भूधारक शेतकर्‍याने, लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर दुसरी आत्महत्येची घटना पाचेगावमध्ये घडली आहे. राज्यात सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत. त्यातच बीड जिल्ह्याचा क्रमांक पहिला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत असून बीड तालुक्यातील वरवटी येथील मंगलदास मनोहर शिंदे वय 50 या यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय.

दुसरी घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे घडलीये. शेतकरी शंकर दुधा चव्हाण वय 55 यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. या दोन्ही आत्महत्या कर्जबाजारी पणामुळं झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. दरम्यान याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणि गेवराई पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे.