स्वच्छता व पाणीपुरवठा, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना बीड नगरपरिषदेच्या गलधान आणि भ्रष्ट कारभाराबाबत तक्रार:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

40

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.30एप्रिल):- शहरात सर्वत्र अस्वच्छता, पाणीटंचाई असताना महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली नसताना संकेतस्थळावर खोटी माहिती प्रसिद्ध करून शासनाची दिशाभूल करून ओडीएफ प्लस प्लस मानांकन व स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ मध्ये भारतातील ३७२ शहरातुन ६७ वा क्रमांक पटकावून फसवणूक केल्याबद्दल उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच नगरपरीषदेमार्फत बिंदुसरा नदीपात्रात कचरा टाकुन प्रदुषित केल्याबद्दल संबधित दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आज ईमेल द्वारे तक्रार केली असून ऊद्या प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे.
.
सविस्तर माहीतीस्तव:-
___

अमृय अटल पाणीपुरवठा योजना योजना व भुयारी गटारी योजनेचे जीवन प्राधिकरण आधिका-यांनी वाटोळे केले म्हणून नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण क्षीरसागर आंदोलन करतात मग ओडीएफ प्लस प्लस मानांकन व स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत ६७ क्रमांक कसा????
_____
बीड शहरातील मंजूर अमृत अटल पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटारी योजनेची कामे मुदत संपुनही पुर्ण केली जात नसुन ठेकेदार एजन्सीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आधिकारी पाठीशी घालत असल्याबद्दल स्वतः नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण क्षीरसागर यांनी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते म्हणजेच स्वच्छता व पाणीपुरवठा संदर्भात मोठ्या योजना अपुर्ण असताना तसेच शहरात
मोठ्याप्रमाणात अस्वच्छता असुन रस्त्यावर घनकचरा आढळुन येतोय

महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसताना संकेतस्थळावर खोटी माहिती कोण देतं????
____
शहरातील मुख्य शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली नसताना संकेतस्थळावर खोटी माहिती प्रसिद्ध करून ओडीएफ प्लस प्लस मानांकन व स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ स्पर्धेत भारतातील ३७६ शहरापैकी बीड नगरपरिषदेचा ६७ वा क्रमांक पटकावून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याबद्दल उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत.

कचरा विल्हेवाट बिंदुसरा नदीपात्रात रोगराई पसरून नागरीकांच्या आरोग्याचं काय???
____

बीड नगरपरीषदेमार्फत शहरातील कच-याची विल्हेवाट बिंदुसरा नदीपात्रात टाकुन करण्यात येत असून नदीचे पात्र प्रदुषित होत असून रोगराई पसरून नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल नगरपरिषद प्रशासनातील आधिकारी तसेच घनकचरा व्यवस्थापन टेंडर धारकांवर कारवाई करण्यात यावी.

शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब
____

बीड शहरातील शासकीय कार्यालये उदाहरणार्थ जिल्हाधिकारी ,तहसिल, पंचायत समिती, जिल्हापरीषद, बसस्थानक आदि ठीकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नसुन संबधित विभागांना निवेदन आंदोलनानंतर सुद्धा त्यांच्यात सुधारणा नाही. संबधित प्रकरणात आवश्यक उपाययोजना करण्यात यावी.

घनकचरा कंत्राटदराकडुन कोण मलिदा खातं???
____
बीड शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट अमरावतीच्या कनक एन्ट्रप्रायजेस कंपनीला देण्यात आले असुन महिन्याकाठी २७ लाख रूपये देयके देण्यात येते मात्र गल्लीबोळात कचरा संकलनासाठी घंटागाड्या येत नाहीत, नाल्यांची साफसफाई होत नाही, रस्त्यावरील धुळ झाडली जात नाही मात्र आधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून कंत्राटदारांच्या कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकुन दंडात्मक कारवाई करण्यात यावी.