वडवणी तालुका उर्ध्व कुंडलिकेच्या पाण्यापासून कोरडा मग तुम्हाला पाणी द्यायचे कुठले- दत्ता वाकसे

33

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.2मे):-वडवणी तालुक्याच्या दृष्टीने आणि तालुका हा पूर्वीपासूनच दुष्काळाच्या झळा सोसत होता त्याच मध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असलेला उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प गेल्या काही वर्षापूर्वी कार्यरत झाला या प्रकल्पाच्या माध्यमातून वडवणी तालुक्यातील डोंगरपट्ट्यासह वडवणी तालुक्याचा काही भाग ओलिताखाली आला त्यामुळे येथील शेतकरी हा सुखावला आहे परंतु वडवणी तालुक्याचा काही भाग हा आणखीही ऊर्ध्व कुंडलिकेच्या पाण्यापासून वंचित राहिलेला आहे त्या ठिकाणी पाणी आणखी पोहोचलेले नाही त्यामुळे तो शेतकरी हातास झालेला आहे.

सध्या परिस्थिती पाहिली तर तालुक्यातील अनेक गावांना पाणी प्यायला उपलब्ध नाही मग आम्ही इतर तालुक्याला पाणी द्यायचे कसे हा प्रश्न सर्वात मोठा असून काल-परवा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काही शेतकऱ्यांनी मोर्चा काढून त्याठिकाणी मागणी केलेली आहे की उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या मधून आम्हाला पाणी देण्यात यावे परंतु आमचा चा अर्धा तालुका ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित राहिलेला आहे त्यामुळे अगोदर आमच्या वडवणी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये या प्रकल्पाचे पाणी पोहोचले पाहिजे त्याचबरोबर वडवणी तालुक्यात आज परिस्थिती पाहिली तर अनेक गावांना शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा झालेला नाही त्यामुळे आमचा वडवणी तालुका अर्धा ऊर्ध्व कुंडलिकेच्या पाण्यापासून कोरडा असताना मग तुम्हाला पाणी द्यायचे कसे.? असा प्रश्‍न उपस्थित करत धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.

पुढे ते दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणाले की आज आम्हाला काही दिवसापासून ऊर्ध्व कुंडलिकेच्या पाण्याचा फायदा होत आहे आतापर्यंत शेतकरी कष्ट करूनही कष्ट उत्पन्न निघत नव्हते परंतु आता काही वर्षांपूर्वी या ठिकाणी हा प्रकल्प झाला या प्रकल्पामुळे शेतकऱ्याला कुठेतरी आनंदाचे दिवस आलेले असतानाच आमच्या प्रकल्पातील पाणी इतर तालुक्यांनी मागता कामा नये अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल आंदोलन करावे लागतील मोर्चे काढावे लागतील जेलभरो करावे लागेल आणि याला सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासन असेल त्यामुळे शासन प्रशासनाने या गोष्टीचा विचार करून ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचा एकही थेंब आम्ही तर तालुक्याला जाऊ देणार नाहीत त्यामुळे शासन प्रशासनाने तात्काळ ज्या ठिकाणी पाण्याचा पर्स असेल त्या ठिकाणी त्या तालुक्याला मोठा प्रकल्प करावा आणि त्या तालुक्याला पाणी उपलब्ध करून द्यावे आम्ही एक थेंबही आमच्या प्रकल्पातील जाऊ देणार नाही असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात वाकसे यांनी म्हटले आहे