जखमी आसम परिवाराला उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळण्यास सहकार्य करावे- ब्रिजभूषण पाझारे

    44

    ✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

    चंद्रपूर(दि.3मे):- तालुक्यातील नकोडा यागावी मागील २९ एप्रिल ला घरगुती गॅस सिलेंडर चा स्फोट झाला होता त्यामध्ये आसम परिवारातील सोडोनी आसम, अनिता आसम व रोहित आसम ह्या तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले. रुग्णांवर जिल्हातील मेडीकल कॉलेज येथे उपचार सुरु आहे. जख्मी रुग्णांना उच्च दर्जाचे उपचार मिळावे याकरिता इण्डेन गॅस एजन्सी मार्फत प्रयत्न करावे.

    तसेच स्फोटात गंभीर जख्मी झालेल्या या तीन रुग्णांना उच्च प्रतीच्या उपचारार्थ स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये हलविण्यात यावे. तसेच गॅस सिलेंडर स्पोट झाल्यास मिळणारे आर्थिक सहाय्य तात्काळ परिवारास देण्यात यावे. याकरिता माजी जि.प समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी इण्डेन गॅस व्यवस्थापक श्री भांडेकर यांना भेटून निवेदन दिले आहे.