दिव्यांगाना मोफत साहित्य वाटपासाठी तपासणी शिबिर

32

🔹दिव्यांग बंधू-भगिनींनी पूर्वतपासणी व नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा – आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3मे):–सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, दिव्यांग सशक्तिकरण विभाग, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद परभणी व आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी पूर्व तपासणी व मोजमाप शिबिराचे आयोजन दि.07 व 08 मे 2022 रोजी गंगाखेड शहरातील संत जनाबाई महाविद्यालयाच्या सभागृहात वेळ सकाळी 10 ते सायं.4वा पर्यन्त आयोजित करण्यात आले असल्याचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी कळविले आहे.

या शिबिरात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अस्थिव्यंग,कर्णबधिर,अंध व मतिमंद या चारही प्रवर्गातील दिव्यांगांना भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम -कानपूर येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करून त्यांच्या दिव्यांगत्वा नुसार आवश्यक ते कृत्रिम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी पूर्व तपासणी व मोजमाप घेण्यात येणार आहे.अस्थिव्यंग प्रवर्गासाठी तिनचाकी सायकल,व्हिलचेअर, कुबडी जोड, सर्व प्रकारच्या स्टिक, जयपूर फूट,कॅलिफर,व सगळ्यात जास्त आकर्षण असणारी मोटाराईज ट्राय सायकल (बॅटरी ऑपरेटेड) कर्णबधिर प्रवर्गासाठी डिजिटल श्रवण यंत्र,अंध प्रवर्गासाठी शालेय विद्यार्थ्यांना ब्रेल किट, स्मार्ट केन, डेजी प्लेयर, तर महाविद्यालयीन अंध युवकांसाठी स्मार्ट फोन व स्मार्ट केन,तर मतिमंद प्रवर्गातील (वय वर्षे 04ते 18)एम.आर.किट,सि.पी. चेअर,व्हिलचेअर व इतर वाटपासाठी तपासणी व मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगानी आपल्या नावाची online नोंद आपल्या नजिकच्या आपले सरकार (कॉमन सर्विस सेंटर) येथे जाऊन करावी व नोंद केलेला नोंदणी क्रमांक सोबत आणावा. तसेच दिव्यांग प्रमाण पत्राची झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला झेरॉक्स व एक पासफोर्ट आकाराचा फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी मो.9850141431,9112131924 यांच्याशी संपर्क साधावा.गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील दिव्यागांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपले जीवन अधिक सुखकर करावे असे आव्हान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.