म्हसळा घोणसे घाटात खासगी बसला अपघात, तीनजण दगावले तर ३५ प्रवासी जखमी

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)Mo:-९७६८४२५७५७

रायगड(म्हसळा):- विरार नालासोपारा येथुन श्रीवर्धनकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्राजक्ता ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 04 एफके 6614 या खासगी बसला घोणसे घाटातील तीव्र उतारा वरील केळेवाडीच्या वळणावर भीषण अपघात होऊन अपघातात ३ प्रवाशी ठार तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १५ प्रवाशी गंभीर आसुन त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव, अलिबाग येथे आणि महाड येथे हलविण्यात आले असल्याचे डॉ.सुशांत गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले. १५वर्षा पुर्वी अपघास कर्दनकाळ ठरलेल्या घोणसे घाटात पर्यायी मार्ग झाले पासुन अपघातांची होत असलेली मालिका आणि जीवितहानी थांबलेली असताना प्राजक्ता ट्रॅव्हल चालकाने गाडी बेदरकारपणे चालवुन निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जीवितहानीस कारणीभूत ठरला आहे.

माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर म्हसळा पासुन ६ किमी अंतरावरील घोणसे घाटातील उताराचे शेवटच्या तीव्र वळणावर सकाळी ७.४० वाजताचे दरम्यान गाडी अंदाजे ७० ते ८०फूट खोल भरधाव वेगाने कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील अश्विनी शैलेश बिरवाडकर, वय वर्षे ३५ , रा.धनगरमलई,मधुकर बिरवाडकर, वय वर्षे ६०, रा.धनगरमलई, सुशांत रिकामे वय वर्षे २८, राहणार वडघर पांगलोली यांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर ३४प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १५ प्रवासी गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक घोणसे,देवघर येथील रहिवासी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले आहे. २२ ते २५ प्रवासी क्षमता असलेल्या अपघाती बसमध्ये दोन चालकांसह ३६ प्रवाशी मुंबई उपनगरातील विरार नालासोपारा येथुन बोर्ली – श्रीवर्धनकडे प्रवास करीत असल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED