बीड नगरपरीषदेला यशवंतराव चव्हाणांचा विसर पडला; नाट्यगृहात असुविधा सोबतच घाणीचे साम्राज्य -डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

86

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.9मे):-शहरातील वैभव म्हणून नावावरुन आलेले भव्यदिव्य यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात असुविधे बरोबरच मोठ्याप्रमाणात सर्वत्र अस्वच्छता, दुरावस्था, घाणीचे साम्राज्य दिसुन येत असून नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागातील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर मोठ्याप्रमाणात धुळ साचलेली आढळुन आली असून एकंदरीतच नगरपरिषदेला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा विसर पडलेला दिसुन येत असून संबधित प्रकरणात चौकशी करून नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, नगरविकास मंत्री यांना ईमेलद्वारे तक्रार केली आहे.

सविस्तर माहीतीस्तव
____
बीड नगरपरिषद अंतर्गत यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत असलेल्या सिमेंट नाल्याची गटारे तुंबलेली असून त्याठिकाणची ब-याच दिवसापासुन साफसफाई करण्यात आली नसल्याचे दिसून येते, तसेच मुख्य प्रवेशद्वार समोरील ग्रांऊंड फ्लोअर फरश्या तुटलेल्या अवस्थेत तसेच लाईटसाठीची फोकस तुटलेल्या अवस्थेत असुन त्यासाठी झालेला खर्च वाया गेल्याचे दिसून आले असून नाटय़गृहाच्या आतील बाजूस सर्वत्र धुळीचे तसेच केरकच-याचे साम्राज्य दिसुन आले. विशेष बाब म्हणजे दर्शनी काचेचेद्वाराजवळ भला मोठा दगड ठेवलेला आढळुन आला.

यशवंतराव चव्हाण अर्थाकृती पुतळ्यावर धुळ साचलेली, नगरपरीषदेला विसर
________
विशेष आणि अत्यंत निषेधार्ह बाब म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाण यांचा अर्थाकृती पुतळा धुळीने माखलेल्या अवस्थेत असुन त्यावर धुळ साचलेली आढळुन आली त्यामुळेच नियमित स्वच्छता साफसफाई होत नसल्याचे सिद्ध होत असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार केली आहे.

भव्यदिव्य नाट्यगृह केवळ नावालाच,सुविधांची वानवा
____

बीड शहरातील नाट्यगृह भव्यदिव्य स्वरूपात असुन कोट्यावधीचा खर्च केलेले नाट्यगृह दुरावस्थेत असून वातानुकूलित सुविधेची व्यवस्था असताना ऐन कार्यक्रमात मात्र बंद अवस्थेत आढळून येते,मग सर्वसामान्य कार्यक्रम वगळता केवळ नगरपरिषद राजकीय नेत्यांच्या कार्यकर्मालाच सुविधा पुरवते का??असा सर्वसामान्य नाट्यरसिकांना प्रश्न पडला आहे.