समस्त माळी समाजपंच मंडळातर्फे ” ११ मे- महात्मा दिन ” उत्साहात साजरा

27

🔹तात्यासाहेबांचे विचार प्रेरणादायी – विठोबा माळी[ माळी समाज अध्यक्ष ]

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.12मे):- धरणगांव येथे समस्त माळी समाजपंच मंडळातर्फे ” ११ मे – महात्मा दिन ” उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रपिता – सत्यशोधक – महात्मा जोतीराव फुले यांचा प्रतिमेचे पुजन माळी समाज अध्यक्ष विठोबा माळी, उपाध्यक्ष निंबाजी माळी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , सचिव गोपाल माळी, यांचा हस्ते करण्यात आले.यावेळी माळी समाज पंच मंडळाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी सर यांनी महात्मा फुले यांचे बहुजन समाजासाठी केलेला संघर्ष, व त्याचप्रमाणे त्यांनी केलेले सामाजिक सुधारणा, शैक्षणिक व विधायक कार्य विशद केले.

महात्मा फुले यांना कोणाचा शिफारसी मधुन ही पदवी मिळाली नाही तर मुंबई येथील कोळीवाड्यात रावबहादुर वड्डेवर, नारायण मेघाजी लोखंडे व सत्यशोधक कार्यकर्ते व लाखोंच्या उपस्थित जनतेने तात्या साहेबांना ही पदवी दिली. याचा इतिहास सांगितला. तसेच समाजातील तरुणांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचारातुनच भारताचा प्रगतीचा मार्ग जातो. हे समप्रमाण प्रतिपादन केले.याप्रसंगी नगरसेवक कैलास माळी, पत्रकार आर.डी.महाजन, हेमंत माळी सर , विनायक महाजन. नितेश वाघ, भैय्या महाजन, भगवान तायडे, समाधान वाघ, निवृती माळी, कैलास माळी तसेच बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.