प्रा राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीरचे आयोजन

✒️बडनेरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

बडनेरा(दि.14मे):-स्थानिक बडनेरा येथील प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट, बडनेरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि रेड रिबीन क्लबद्वारे महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयीन सर्व कर्मचारी यांच्या सतत च्या दगदगीच्या जीवनातील ताण व ओसरत्या कोरोना स्थिती पाहता दिनांक १४ मे २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ दरम्यान महाविद्यालय परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वच्छता व सुदृढ आरोग्याच्या मंत्र देणारे गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला हारार्पण करीत शिबिराचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित उपप्राचार्य प्रा पि व्ही खांडवे, सांगाबाअवि बडनेरा रिजन रासेयो क्षेत्रीय समन्वयक प्रा. सारंग धावडे, हायटेक सुपरस्पेशिऍलिटी हॉस्पिटलचे डॉ दिनेश वाघाडे, डॉ स्वप्नील शिरभाते, डॉ देशमुख सर, डायरेक्टर अँडमिनीस्ट्रेटीव्ह मनाली बोन्डे, डॉ मनोदय मोहोड, डॉ पूनम इंगोले, पीआरओ अनिल मानकर तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ दिनेश हरकूट, डॉ प्रीती खोडके, डॉ काश्मिरा कासट, डॉ आशिष कडू, डॉ मनीष बैस, डॉ प्रविन चौधरी तसेच, महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वर्ग, शिकेत्तर कर्मचारी, ऑफिस कर्मचारी आणि साफसफाई महिला कामगार यांनी शिबिराचा लाभ घेत उपस्थिती दर्शविली. सदर शिबिरात हायटेक सुपरस्पेशिऍलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, अमरावतीच्या चमूद्वारे उपस्थितांचे बीपी, शुगर, ईसीजी तसेच तज्ञ डॉक्टर्स तर्फे कन्सलटेशन मोफत करण्यात आले.

कार्यक्रमांचे आयोजन रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सायवान यांनी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा अनुराधा इंगोले, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अतुल डहाणे, प्रा. गायत्री बहिरे, प्रा. आशुतोष उगवेकर, प्रा अपर्णा खैरकर, श्री. निशांत केने, श्री मनीष नवले, श्री डी आर इंगोले, श्री गुल्हाने तसेच रासेयो दूत ऋषिकेश अलासपुरे, आयुष भगत, अमीर फराज, वेदांत वातिले, सुमित मुंदाने, विवेक देशमुख, हर्ष माकोडे, आकाश ठाकरे, प्रथमेश वानखडे यांच्या सहभागाने केले तसेच शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व रासेयो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली यांचे मा र्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे मा. अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, मा. उपाध्यक्ष अॅडव्होकेट. उदयजी देशमुख, मा. कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, मा. सचिव श्री. युवराजसिंगजी चौधरी, सन्माननिय सदस्य मा. श्री. शंकरराव काळे, मा. श्री. नितीनजी हिवसे, मा. सौ. रागिनीताई देशमुख, मा. डॉ. सौ. वैशालीताई धांडे व मा. डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED