भोजगाव-गौंडगाव-कोमलवाडी ग्रुप सेवा सहकारी सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

38

🔹चेअरमनपदी सुनिल देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी दत्ता संत यांची निवड

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.१६मे):- गेवराई तालुक्यातील भोजगाव-गौंडगाव-कोमलवाडी येथील सहकारी सोसायटीची निवडणूक दि,२४ एप्रिल रोजी झाली असून सांयकाळी निकाल जाहीर करण्यात आला या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जगदंबा शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या १२ पैकी १२ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन पदासाठी घेण्यात आलेली निवडणूक झाली असून चेअरमनपदी श्री. सुनिल देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. व व्हाईस चेअरमनपदी श्री. दत्ता संत यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सेवा सहकारी सोसायटी निवडणूक दि,२४/०४/२०२२ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गेल्या १५ वर्षांपासून डिगांबर संत हे सोसायटीचे चेअरमन होते. त्यांनतर त्यांचे निधन झाल्यामुळे मागील काही वर्षांपासून त्यांचा मुलगा दत्ता संत हे चेअरमन पदावर तळमळीने काम केले. आणि त्याच बरोबर या पंचवार्षिकला देखील जगदंबा शेतकरी ग्रामविकास पॅनल ने बाजी मारली आहे..

यावेळी भोजगाव-गौंडगाव-कोमलवाडी सोसायटीचे नुतन चेअरमन श्री. सुनिल देशमुख व व्हाईस चेअरमन श्री. दत्ता संत आणि सर्व उमेदवारांचे सत्कार करण्यात आला या निवडणुकीसाठी भोजगाव-गौंडगाव-कोमलवाडी या गावातील मतदार बंधू आणि भगिनींनी आशिर्वादाने सुनिल देशमुख व दत्ता संत यांना या चालू पंचवार्षिक मध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडणुकीमध्ये सर्व सहकार्यांनी देखील अथक परिश्रम घेतले आहे. त्याबद्दल जगदंबा शेतकरी ग्रामविकास पॅनल चे सर्व उमेदवारांनी आभार मानले