नगरपरिषद कर्मचाऱ्यांना (GR) नुसार एक महिन्याच्या आत वेतन द्या अन्यथा आम आदमी पार्टी द्वारा आंदोलन

30

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.18मे):- ग्रामपंचायत नगरपरिषद घोषित होऊन जवळपास एक ते दीड वर्ष लोटून गेलेली आहे. ग्रामपंचायत काळापासून काम करत असलेले स्थायी व अस्थायी कर्मचारी मागील कित्तेक वर्षांपासून काम करीत आहे. परंतु मागील दीड वर्षापासून घुग्घुस नगरपरिषद घोषित होऊन सुद्धा नगरपरिषद कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्का पासून वंचित ठेऊन त्यांचे शोषण केले जात आहे.

आम आदमी पार्टी द्वारा मागील एक वर्षा पासून सतत नगरपरिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, सहाय्यक कामगार आयुक्त, यांच्या कडे वारंवार निवेदन करून सुद्धा याची दखल घेण्यात आलेली नाही.त्यामुळे येत्या एक महिन्याच्या कालावधी मध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देण्यात आले नाही तर आम आदमी पार्टी द्वारा येत्या एक महिन्या मध्ये नगरपरिषद विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी दिला.

यावेळी शहर उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.