मौजे मोहा(इ) येथे बौद्ध पौर्णीमेंच्या निमित्य नालंदा बुद्धविहार कडुन वंदन बुध्दाला या भिमगिताला जनतेचा चांगलाच प्रतिसाद

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.23मे):-पासुन जवळच असलेल्या मौजा मोहा इजारा येथे नुकताच भिम बुध्द गिताचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,सर्व प्रथम तथागत गौतम बुद्धाच्या व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला धुपदिपाने पुजन करण्यात आले आणी वंदन बुद्धाला या बुध्द भिम गिताचा बहारदार संगीतमय ऑर्केष्टा सुप्रसिध्द गायक राहुल तायडे व गायीका प्रतिक्षा डांगे व संच अमरावती यांचा बुद्ध आणी भिम गिताचा बहारदार कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्बन बँकेचे चेअरमेन आदरणीय शरदभाऊ मैन्द हे उपस्थीत होते तर उदघाटक म्हणुन लोकहित हायस्कुलचे संस्थाचालंक महेशभाऊ खडसे यांची उपस्थीती होती तर प्रमुख अतिथी म्हणुन मा.किशोरभाऊ मुजमुले,आनिलभाऊ चव्हाण (पाटील) आनिल हाटेकर,शितलकुमार वानखेडे,देवेद्र खडसे प.स.सदस्य संदिप कावळे,हेमंत इंगोले एन.के.चव्हाण,व इत्यादी प्रामुख्याने उपस्थीती होते.

या कार्यक्रमाला सबोधित करतांना शरदभाऊ मैन्द यांनी समाज बांधवांना असा संदेश दिला की तथागत गौतम बुद्ध पोर्णीमा दरवर्षी थाटामाटात साजरी करून गौतम बुद्धाचे विचार सर्व सामाण्यपर्यत व घरोघरी पोहचविण्याचे काम केले पाहीजे व शांतीचा संदेश सर्वान पर्यत पोहचला पाहीजे असे यावेळी अध्यक्ष बोलले या कार्यकमाचे सुंत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले तर आभार नालंदा बुद्ध विहाराचे अध्यक्ष किसन इंगोले यांनी मानले या कार्यक्रमासाठी अतीशय परीश्रम घेऊन अनमोल कौतुक करावे तेवढे कमिच आहेत असे नालंदा बुद्ध विहार मोहा इजारा येथील जेष्ठ मार्गदर्शक तथा पत्रकार बळवंत मनवर,यांनी तरूण युवक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्याना योग्यवेळी मार्ग दाखविला आणी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.व पोलीस प्रशांसनानी चोख बंदोबस्त देऊन देखील शांतता सुव्यवस्था राखण्याचे मनोबल देऊन मंडळास सहकार्याची भावना देखील दिली त्या बदल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यानी त्यांचे मनापासुन आभार देखील मानले आहे.

नालंदा बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष कीसन इंगोले,व तसेच कार्याध्यक्ष अमोल विजय मनवर,उपाध्यक्ष तुकाराम मनवर,भिमराव मनवर,भिमराव खडसे,अरुन भि,मनवर,शिवा आवढे,श्याम आठवले,संदीप वाळके,बाबाराव मनवर,अरुण सु,मनवर,बाळासाहेब मनवर,अश्वीन पाईकराव,रोहन बरडे, व समस्त गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थीत होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED