प्रा. डॉ.एम.डी.इंगोले यांना “समाज भूषण पुरस्कार” प्रदान

37

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24मे):-येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक प्रा.डॉ.एम.डी.इंगोले यांना सत्य शोधक फाऊंडेशन व मानव विकास संशोधन संस्था नांदेड़ द्वारा आयोजित “महाकवी वामनदादा कर्डक साहित्य सम्मेलनात” सिने अभिनेता मा.मिलिंद शिंदे, यशदाचे मा.डॉ.बबन जोगदंड, मा.सुषमाताई अंधारे, निमंत्रक पी.जी.मिसाले या मान्यवरांच्या हस्ते “समाज भूषण राष्ट्रीय पुरस्कार” (वामनदादां
च्या काव्य साहित्यावर समीक्षात्मक लेखन केल्याबद्दल) प्रदान करण्यात आला.

या पूर्वी प्रा. डॉ.एम. डी.इंगोले यांच्या “यादों के झरोखे से” या आत्मकथेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर तर्फे प्रथम राज्य स्तरीय पुरस्कार, नवी दिल्ली येथील बाबु जगजीवनराम क.सं.व साहित्य अकादमी द्वारा “राष्ट्रीय पुरस्कार” लखनऊ येथे बोधिसत्व बाबासाहेब टुडे तर्फे मा.राज्यपाल रामनाईक, माजी राज्यपाल डॉ.माताप्रसाद यांच्या हस्ते “राजर्षि शाहु राष्ट्रीय पुरस्कार”, नागपुर येथे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडल द्वारा जागतिक कीर्तिचे पुज्य भदंत सुराई ससाई यांच्या हस्ते “वामनदादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार” नलदुर्ग येथे सुप्रसिद्ध पत्रकार मा.निखिल वागले यांच्या हस्ते “संत रविदास ज्ञानकिरण राज्य स्तरीय पुरस्कार” तसेच परभणी येथे कलावंत राज्य स्तरीय परिषदे तर्फे “वामनदादा कर्डक राज्य स्तरीय पुरस्कार” आदि पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

प्रा. डॉ.एम.डी.इंगोले यांनी अनेक राज्य स्तरीय, राष्ट्रीय, अंतरर्राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग व संशोधन पर आलेख वाचन केले आहे. सात ग्रंथ प्रकाशित दोन प्रकाशनाधीन आहेत.या यशाबद्दल संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.आत्माराम टेंगसे, सचिव अड.संतोष मुंढे, कोषाध्यक्ष अड.श्रीकांत चौधरी, सर्व संचालक, प्रचार्य डॉ.बी.एम.धूत, उपप्राचार्य डॉ.दयानंद, डॉ.चंद्रकांत सातपुते, सहकारी प्रा. व. शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इष्ट मित्र, साहित्यिक कवि, सामाजिक कार्यकर्ते आदिनीं वाट्सएप व प्रत्यक्ष मोबाइल वरुण अभिनंदन व अभिष्ट चिंतन केले.