नेहरूंच्याच धोरणाने देशाचा सर्वांगीण विकास – महेंद्र ब्राम्हणवाडे

38

🔸स्वतंत्र भारताच्या उभारणीत पंडित नेहरूंचे मोठे योगदान -प्रभाकर कुबडे

🔹जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरूं आणि माता रमाई यांना अभिवादन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.27मे):- प्रधानमंत्री मोदी राजकीय भाषणात कितीही नेहरूंचा विरोध करत असले, टीका करत असले तरी जागतिक पातळीवर देशाचा कारभार सांभाळताना नेहरुजींच्या विचारांवर व धोरणांवर पाऊल ठेऊन चालावं लागत आहे. हाच काँग्रेसचा विजय आहे. ज्या नेहरूंवर मोदी आज टीका करतात त्यांच्याच अलिप्तता वादी धोरणाने रशिया आणि युक्रेन च्या युद्धा पासून आपल्याला  दूर ठेवले आहे. असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले आहे.तर स्वातंत्र्य भारताच्या उभारणीत पंडित नेहरूंचे मोठे योगदान आहे त्यांच्याच योगदाने सुई पासून तर आज मोठ्या मोठया मशिनी तयार केल्या जात आहे असे मार्गदर्शन काँग्रेस नेते प्रभाकर कुबडे यांनी केले ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी महिला काँग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस डॉ.चंदाताई कोडवते, महिला अध्यक्ष रुपालिताई पंदिलवार, शहर अध्यक्ष सतिश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर,शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार एटापल्ली तालुका अध्यक्ष संजय चरडूके, माजी जि.प.सदस्य नंदूजी नरोटे, प्रभाकर कुबडे, माजी नगरसेवक नंदूजी कायरकर, निजान पेंदाम, मोहन नामेवार, शामराव चापले, अब्दुल पंजवानी, जावेद खान, चारुदत्त पोहणे, बाबुराव गडसूलवार, भैयाजी मुद्दमवार, निशाताई आयतुलवार, कल्पनाताई नंदेश्वर,गौरव एनपरेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, आतिफ खान सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.