ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे वार्षिक आनंद तरंग स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

65

🔹वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रितम खंडाळे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30मे):- ब्रम्हपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे काल दिनांक 29 मे रोजी वार्षिक आनंद तरंग स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता.छोट्या चिमुकल्या मुलांपासून तर मोठ्या व्यक्ती नी सुध्दा अंगभूत कला सादरीकरण केले. यामध्ये सोलो नृत्य, समूह नृत्य, गीत गायन, कोळी नृत्य, इत्यादी कलाचे सादरीकरण करण्यात आले. या बरोबरच पाणी अडवा पाणी जिरवा, पृथ्वी वाचवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती या सर्व विषयावर संदेशात्मक नृत्य सादर करण्यात आले. दिनांक 28 मे रोजी विविध इनडोअर खेळाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर संस्थेत अशी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकोप्याची, बंधुत्वाची व एकजुटीने कार्य करण्याची भावना वृध्दींगत होते. आणि कार्य क्षमता वाढत असते.
सदर कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रितम खंडाळे यांच्या विचारधारेतुन करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आले.