प्रताप मिल कंपाऊंड अमळनेर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

81

🔸आढावे कुटुंबीयांच्या वतीने उपस्थितांना अहिल्यादेवींचे जीवन चरित्र भेट !…..

✒️अमळनेर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमळनेर(दि.31मे): – प्रताप मिल कंपाऊंड अमळनेर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.व्ही.आढावे यांनी केले.प्रताप मिल कंपाऊंड च्या सर्व सन्माननीय रहिवाशांच्या शुभहस्ते महिलांचे प्रेरणास्थान – राजमाता – राष्ट्रमाता – मॉंसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शशिकांत आढावे सर व श्रीमती कविता मनोरे मॅडम दांपत्यांकडून राजमातेच्या जीवन चरित्राचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी डी.ए. धनगर, आत्माराम कंखरे साहेब, मुरलीधर मोरे, भगवान धनगर, सुनिल आगोणे साहेब, प्रा. राहुल निकम, प्रा.विजय गाढे, बागुल आप्पा, नामदेव अहिरे, पालवे सर, भगवान धनगर, शशिकांत आढावे, प्रा.गुलाले सर, ईश्वर ठाकरे, नरेश बरकडे, सुभाष चौधरी, प्रदिप ठाकरे, श्रीमती मनोरे मॅडम, श्रीमती साबे मॅडम, मा. श्रीमती दाभाडे मावशी व प्रताप मिल कंपाऊंड चे बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.