चक्क ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी रस्ता नाही

45

🔹गावकऱ्यांचा संताप-प्रशासनाचे दुर्लक्ष

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.1जुन):- जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत इरई गावातील ही समस्या आहे, इरई येथील गावकरी आजही ग्रामपंचायत कार्यालयात ये-जा करण्यासाठी पायदळ चिखल तुडवत जात आहे, याचे कारण असे की स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर सुद्धा इरई भारोसा रोड अद्यापही पूर्ण झाला नाही, कित्येकदा हा रोड मंजूर झाला,अनेकदा रोडसाठी लागणारे साहित्य जसे की *गिट्टी*पण रोडला टाकली पण टाकलेली गिट्टी सुद्धा उचलून नेण्यात आली.

पण मंजूर झालेला रोड कुठे जातो आणि टाकलेला मटेरियल का बरं उचलून नेतो हे कुणालाच माहीत नाही, इरई येथे वर्ग 4 थी पर्यंत शाळा आहे पुढील शिक्षणासाठी भारोसा किंवा भोयगाव ला जावे लागते ते पण चिखल तुडवत लहान मुलांनी शिक्षण घ्यायचे तरी कसे असा सवाल संतप्त गावकऱ्यांना पडला आहे, कृपया आतातरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे….।