प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रसाद कानडे यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात सत्कार

32

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.10जून):-भारतीय क्रिकेट संघाचे भूतपूर्व खेळाडू मराठवाड्याचे भूमिपुत्र,महाराष्ट्र रणजी क्रिकेट टीमचे स्टार गोलंदाज, ना.धनंजय मुंडे यांचे जिवलग मित्र प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रसाद कानडे वैद्यनाथ मंदिर येथे प्रभु वैद्यनाथांच्या दर्शनासाठी आले असताना त्यांचा जगमित्र कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अनिल वालेकर व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी प्रसाद कानडे यांचा सत्कार केला. यावेळी ना.धनंजय मुंडे यांनी फोन वरून प्रसाद कानडे आणि सहकाऱ्यांना क्रिकेट क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन,मुंबई क्रिकेट असोसिएशन च्या पदाधिकारी यांनी संवाद साधत ग्रामीण भागात देखील क्रिकेटसाठी मोठे कार्य उभा राहणार असून क्रिकेटप्रेमी असणारे नेतृत्व ना.धनंजय मुंडे यांच्या सहयोगाने बीड जिल्ह्यात व परळी मध्ये देखील क्रिकेट सबंधी प्रशिक्षण व मैदाने विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला.

प्रसाद कानडे आणि परळीचे जिव्हाळापूर्वक नाते आहे.महाराष्ट्र रणजी संघाचे स्टार गोलंदाज असणारे प्रसाद कानडे यांनी परळी मध्ये एक सामना देखील खेळल्याची आठवण यावेळी सांगितली. त्याचप्रमाणे अनेक मित्रांची विचारपूस देखील केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह ओम मेनकुदळे,अजय जोशी ,अविनाश गवळी,जगदीश कावरे ,बबन जंगले आदी उपस्थित होते.