महिलेने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

🔹सकाळी आठ वाजता च्या सुमारासची घटना, कारण अजूनही अस्पष्ट

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.10जून):-भातकुली तालुक्यातील येणारे गाव गणोजा देवी तेथे एका विवाहित महिलेने सकाळच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून गावातच राहणारे मनोज दिनकर देशमुख राहणार यांची पत्नी मृतक कांचन मनोज देशमुख वय 42 वर्ष रा. गणोजा देवी हिने गावातील शेतकरी नाना साहेब देशमुख यांच्या शेतात जाऊन सुमारे आठ वाजताच्या सुमारास विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तर मृतक महिलेने आत्महत्या का गेले याचे कारण अजूनही अस्पष्ट असल्याची माहिती मिळाली आहे.

मात्र मृतक महिलेने आत्महत्या का केली याचा शोध घेण्याकरता भातकुली पोलीस स्टेशनची टीम तपास करीत आहे. उत्तर कांचन देशमुख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये यांचे पती मनोज देशमुख यांना लहान दोन मुली असा व्याप्त परिवार आहे.तर मृतक महिलेस अमृता वय 16 वर्ष व एक लहान मुलगी यांच्यासह संपूर्ण देशमुख कुटुंबीयांवर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अमरावती, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED