‘ निस्वार्थ ‘ ला अनेकांची साथ ..!-वडिलांच्या स्मृती निमित्त लेकीने भरवला मायेचा घास

34

✒️जळगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जळगाव(दि.12जून):- येथील निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान हे दररोज गोरगरीब तथा भुकेने व्याकुळ असलेल्या लोकांना फूड बँक च्या माध्यमातून मदतीचा हात म्हणुन दररोज आपल्या फूड व्हॅन मध्ये अन्नदान व ज्या ही ठिकाणी आवश्यक असेल तेथे जाऊन सामाजिक जबाबदारी निभावत असतात. धीरज जावळे , नकुल सोनवणे, सुलतान पटेल,गणेश देसले,शारदा सोनवणे, धनंजय सोनवणे व अविनाश जावळे या तरुण मित्रां सोबतच त्यांचे सहकारी मित्र या दैनिक कार्यात उस्फुर्त सहभागी होत समाजसेवा करत असतात.

कोविड कालावधी मध्ये देखील निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फूड बँक संस्था ने प्रचंड मेहनत घेत जनसामान्यांना जेवणाची व्यवस्था करत मोलाचे सहकार्य केले. यात त्यांना अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी सहकार्य केले . ज्यात वाढदिवस , यश निवड , सेवा निवृत्त , नवीन जन्मास आलेल्या मुलांचे आगमन निमित्ताने अन्नदान करण्यात अनेक लोक सहभागी होतात.

लेकीने भरवला मायेचा घास…!

नेरी दिगर येथिल एस टी महामंडळ कर्मचारी कै. अभिमन्यु हिवरे यांचा दिनांक (12 जुन 2022 रविवारी) पाचवा स्मृती दिवस होता . त्या निमित्ताने त्यांची मुलगी स्वाती हिवरे – काटे (ह मु औरंगाबाद) यांनी सामाजिक जाण राखत आपल्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फूड बँक यांच्या मदतीने रविवारी अन्नदान केले. त्यांच्या या नवीन संकल्पना ने सर्वत्र कौतुक होत असुन समाजात अश्या नवीन विचारांनी पुढाकार घेत अनेक लोक समोर येत आहेत म्हणुन कौतुक व्यक्त केले जात आहे.
—————
गोर गरीब लोकांना एक वेळ जेवणाची सोय आम्ही करत असतो . त्यात अश्या प्रकारे मदत करणाऱ्या समाजाभिमुख लोकांची साथ मोलाची आहे . बऱ्याच वेळेला अडचणी येतात परंतु ‘ निस्वार्थ ‘ ने अखंडपणे ही सेवा सुरू ठेवली आहे.

– धीरज जावळे सर
अध्यक्ष निस्वार्थ , जळगाव
——–
वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त काहितरी करावे हे मनात होते . परंतु मनुष्यसेवा हीच खरी सेवा ही जाण राखत वडिलांच्या स्मृतींना चांगला आशीर्वाद मिळावा म्हणून अन्नदान केले. समाजाने ‘निस्वार्थ ‘ फाउंडेशन सारख्या संस्थांना मदत केली पाहिजे

स्वाती हिवरे – काटे
नेरी दिगर (ह मु औरंगाबाद)