भिमस्तंभ विश्वशांती बुद्धविहार येथील पाच दिवसीय बाल संस्कार शिबिराचा सांगता समारोह

33

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13जून):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ (पुर्व) चे विद्यमाने आणि तसेच तालुका शाखा पांढरकवडा चे सहकार्याने पाढरकवडा येथील भिमस्तंभ विश्वशांती बुध्दविहार आंबेडकर वार्ड येथे पाच दिवसीय बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात असंख्य बालकांनी सहभाग घेतला होता. या शिबिरात एकंदरीत त्रिसरण, पंचशील अर्थासह-डाॅ.बाबासाहेब आंबेडकराचे बालपण आणि शिक्षण- सिद्धार्थ गौतमाचे बालपन व शिक्षण-डाॅ.बाबासाहेब आंबेडकराचा संदेश- बौद्धांचे सण व मंगल दिन-ईत्यादी अनेक विषयाची माहिती देण्यासाठी डाॅ. प्रा.उत्तम शेंडे,प्रा.अन्ना मुन,विनय जनपदकर,तसे खोब्रागडे सर,ताकसांडे सर, प्रमोद रामटेके यांनी विशेष परिश्रम घेऊन हे शिबिर यशस्वीपणे पुर्ण केले.