जगाला करुणेची गरज आहे!

87

ज्यांना बुध्दाची सेवा करायची आहे त्यांनी आजारी व्यक्तीची सेवा करावी.भगवान बुध्दांचा हा उपदेश मानवता व माणुसकी जपणारा आहे.या उपदेशाचे आपण पालन नाही केले तर आपण कसले बौद्ध? जगाला करुणेची गरज आहे.मैत्री भावना ही अंतर्मनात असली पाहिजे ती वरवरची असता कामा नये.जर मैत्ताभावना अंतरमनातुन नसेल तर ती केवळ पोपटपंची होते.अंतर्मनात असलेलीच मैत्ताभावना ही करुणेमधे बदलुन ती प्रत्यक्षात कृतीत उतरत असते.अन्यथा ती मेत्ता भावना काय कामाची?

मेत्ता भावना करताना मन सर्वव्यापक व सर्वसामावेशक असलं पाहिजे.त्यात मतभेद तर्क वितर्क व असमानता असता कामा नये.आपण मेत्ता भावना करताना अहिंसक पशु पक्षाला जशी मेत्ता भावना करतो तशीच ती हिंसक पशु पक्षालाही करत असतो.जशी मेत्ता भावना आपण आपले आप्त मित्र परिवाराला करतो तशीच मेत्ता भावना आपण आपल्या वैर्यांना, शत्रुंनाही करतो.बुध्द दक्खिणविभंग सुत्तात म्हणतात आपण एखाद्या तिरच्छान्न जीवसृष्टीतल्या जीवाला देखील दान केलं तरी पुण्य प्राप्त करत असतो.बुध्द शासनातल्या व्यक्तीची तर गोष्टच काय? कारण दानामधे तुमचा त्याग असतो आणि त्यागातुनच धम्मधारणेला सुरुवात होत असते.समोरची व्यक्ती कोण आहे कशी आहे हे बघण्यापेक्षा वर्तमान परिस्थिती पहाणे हे महत्वाचे असते.

दुःखी,रोगी,व्याकुळ व्यक्तीच्या प्रती प्रेम,करुणा,मैत्री असावी.बुध्दांनी शेवट पर्यंत देवदत्तावर मैत्रीच केली.

✒️भंते शाक्यपुत्र राहुल(श्रावस्ती बुद्धविहार पैठण)मो:-9834050603