डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना मिटर अनुसूचित जाती नागरिकांना व अनुसूचित जमाती नागरिकांना 500 रुपयात लाईट मिटर वाढवून देण्याची मुदत मंत्रिमंडळात मंजुरी-जनसेवक प्रमोद मस्के यांची माहिती

40

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17जून):-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री ना मा अशोकरावजी चव्हाण साहेब हे गंगाखेड येथे उड्डाणपुलाच्या उद्घाटन निमित्ताने आले असताना त्यावेळी त्यांची भेट घेऊन गंगाखेड शहरातील महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती नागरिकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल2021 ते दिनांक 6 डिसेंबर 2021 या मुदतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत योजना होती परंतु महावितरण कार्यालय मार्फत 500 रुपया मध्ये वीज मीटर ही योजना सदरील योजनेचे महावितरण कार्यालय तर्फे कोणतीच प्रसिद्धी व जनजागृती न झाल्याने या योजनेचा अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना फायदा मिळाला नाही तसेच शासनाचे धोरण आकडामुक्त असल्याने व ते पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची जनजागृती न झाल्याने व अनुसूचित जमाती नागरिकांना लाभ घेण्यासाठी आपण येणाऱ्या कॅबिनेट या बैठकीमध्ये या योजनेची मुदत वाढवून देण्याचे आदेश काढावे अशी शिफारस ऊर्जामंत्री श्रीमान नामदार नितीन राऊत साहेब यांना करावी असे निवेदन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना पाथरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय सुरेशरावजी वरपूडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाची दखल घेऊन राज्याचे ऊर्जामंत्री मा ना नितीनरावजी राऊत साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी मंत्रिमंडळात बैठक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची मुद्दत 6 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत वाढून देण्यात आली.

व गंगाखेड तालुक्यातील व शहरातील सर्व अनुसूचित जाती नागरिकांनी व अनुसूचित जमाती नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमार्फत 500 रुपयात लाईट मीटर योजनेचा सर्वांनी लाभ व फायदा घ्यावा असे आव्हान जनसेवक प्रमोद मस्के यांनी केला आहे तसेच मंत्रिमंडळामध्ये मुदत वाढवून दिल्याबद्दल मा. नामदार नितीनरावजी राऊत साहेबाचे व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना. अशोकरावजी चव्हाण साहेबांचे या योजनेला मुदत वाढवून दिल्याबद्दल त्यांचे आभारी व रुह्रणी आहोत यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ बाळकाका चौधरी साहेब तसेच महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष तथा नगरसेविका सो मनीषा प्रमोद मस्के प्रमोद मस्के जनशक्ती मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष युवा नेते सुशांत भैया चौधरी शेख ताजुद्दिन सामाजिक कार्यकर्ते शेख शाबीर भाई आदी .