प्रा राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा येथे आठवा आंतराष्ट्रीय योगदिन निमित्य योग द्वारे संपुर्ण स्वास्थ कार्यक्रमाचे आयोजन

29

✒️बडनेरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

बडनेरा(दि.21जून):-विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित प्रा राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा येथे २१ जून २०२२ रोजी सकाळी ९ वाजता आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन ऍडमीन बिल्डिंग समोर महाविद्यालय परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा सारंग धावडे यांनी योग शिक्षक म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना योग प्रशिक्षण दिले. यामध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रायलया द्वारा निर्देशित योगा बुकलेट प्रमाणे योगा प्रात्यक्षिक व प्रशिक्षण तसेच विविध योगासनाची माहिती चित्र लावण्यात आले. सध्याच्या सुरू असलेल्या विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा पाहता योगाभ्यासात महाविद्यालयातील उपस्थित फर्स्ट इयर इंजिनीअरिंगच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एस अली, उपप्राचार्य प्रा. पी व्ही खांडवे, एफवायबीई चे विभाग प्रमुख डॉ ए व्ही कडू व सर्व प्राध्यापक वर्ग तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा. सारंग धावडे, क्षेत्रीय समन्वयक, बडनेरा क्षेत्र समेत विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. ए व्ही सायवान यांनी प्रा. एस के कदम आणि महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा ए डी इंगोले यांच्या सहभागातून केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक योग गीत गाऊन करण्यात आली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॉड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य शंकररावजी काळे, नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.