ज्योती क्रांती परिषद शाखेचे कुरुल नगरीमध्ये मोठ्या दिमाखात उद्घाटन

31

✒️विशेष प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

मोहोळ(दि.21जून):- तालुक्यातील कुरुल गावामध्ये ज्योती कं क्रांती परिषदेची शाखेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात जल्लोष यामध्ये उद्घाटन शाखेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश दादा पाटील ज्योती क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष रमेश आप्पा बारसकर यांच्या हस्ते फीत कापून श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या कार्यावर प्रेरित होऊन, मोहोळ तालुका मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल सर्व समाजाने एकत्र घेऊन जाणारे एकमेव नेता म्हणून रमेश आप्पा बारसकर यांच्याकडे पाहिले जाते, कारण सामान्य कुटुंबातून गरीबी काय असते हे जवळून पाहिल्या असल्यामुळे एखाद्या व्यक्ती समस्या घेऊन आले नंतर त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम आप्पानी केला आहे.

कारण गरिबीची धडा काय असतात हे आप्पाने अनुभवल्यामुळे सर्वांना सोबत घेऊन आपल्या सोबतच व्यक्ती लहान आहे की मोठा ही कधीही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन दिन दलितांना न्याय मिळवून देण्याचे काम आज बारसकर साहेब करत आहे. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून मोहोळ वासियांनी प्रथम नगराध्यक्ष होण्याची माळ्या त्यांच्या गळ्यामध्ये टाकली. रमेश बारस्कर राजकारण करत असताना वीस टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करत आहेत. गरीब, मागासवर्गीय लोकांवर अन्याय होत असेल तर त्यांना कधीही सहन होत नाही.

यावेळी रमेश आपापल्या भाषणामध्ये बोलत असताना म्हणाले की कुठल्याही प्रकारचे अडचणी असेल आपण सर्वजण मिळून ज्योती क्रांती परिषदेच्यावतीने त्यांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपण सर्वांनी करायच आहे. आपल्या हातून समाजसेवा घडावी या उद्देशाने युवक वर्ग एकत्र येऊन कुरुल मध्ये ज्योती क्रांती परिषदेचे शाखेची स्थापना केली.

कुरुल च्या नूतन शाखा अध्यक्षपदी अशोक ननवरे उपाध्यक्ष दिगंबर शिंदे रोहित गायकवाड संघटक पांडुरंग माळी अशोक क्षीरसागर सुरेश ननवरे धनाजी माळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश दादा पाटील ,ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश जी आप्पा बारसकर, मानाजी माने, माळी सेवा संघ तालुका युवा अध्यक्ष अतुल ननवरे ,मोहोळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, धनाजी माळी, पांडुरंग माळी, संभाजी माळी, अशोक शिरसागर, आदीसह माळी बांधव ग्रामस्थ उपस्थित होते