महा एनजीओ फेडरेशन व श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृती विद्यालय मसोबा फाटा काकडहिरा येथे योग शिबिर संपन्न

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा वप्रतिनिधी)

बीड(दि.21जून):- आजादी के अमृत महोत्सव अंतर्गत योग यज्ञ महाराष्ट्र राज्यात महा एनजिओ फेडरेशन व श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज जि बीड यांच्या वतीने ( ७५ योग प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन ) करण्यात आले आहे.आज योग दिनानिमित्त संस्कृती विद्यालय मसोबा फाटा काकडहिरा ता बीड येथे २१ जुन रोजी सकाळी ६:३० वाजता योग शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संस्कृती विद्यालय मसोबा फाटा काकडहिरा येथे योग शिबिर कार्यक्रम महा एनजीओ फेडरेशन व श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज जि बीड यांच्या वतीने आयोजीत करण्यात आले होते.

जागतिक योग दिनानिमित्त महाएनजिओ फेडरेशन व श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला पो देवगाव ता केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.यावळी ‘ योगाचे महत्त्व आणि योगाची आवश्यकता ‘ या विषयावर योग मार्गदर्शक दत्ताजी नलावडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शिबीराचे उद्घाटन योग शिक्षक दत्ताजी नलावडे , ऑक्सफैम इंडिया चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी ओमप्रकाश गिरी, पाटील साहेब, तत्वशिल कांबळे , क्रिकेट खेळाडू घुले व बाजीराव ढाकणे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास योगप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच 217 विद्यार्थी सहभागी झाले होते.असे संयोजक बाजीराव ढाकणे व जयवंत ठोंबरे सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. आज आपण सर्वजण कोरोना नावाच्या भयाण संकटाचा सामना करत आतापर्यंत आलो आहोत कोरोना रुग्ण यांचे प्रमाण कमी झाले मात्र अद्याप ते सावट संपले असे नाही .

या संकटातून सुखरूप बाहेर पडायचे असल्यास नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविणे हा एकमेव पर्याय सर्व वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत. असे योग मार्गदर्शक दत्ताजी नलावडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. हजारो वर्षां पासून भारतात योग, प्राणायाम हा उत्तम आरोग्याच्या मंत्र सांगितला आहे. २१ जून जागतिक योग दिना निमित्त नागरिकांना योग – प्राणायाम विषयी प्रशिक्षित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन मुख्य संयोजक म्हणून महा एनजिओ फेडरेशन चे संस्थापक शेखर मुंदडा व विशेष सहकार्य मा. चंद्रकांतजी राठी , महा एनजिओ फेडरेशन चे मुकुंद शिंदे, अक्षय महाराज, ललित वाघ व संचालक मंडळ यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असे बीड जिल्हा संयोजक बाजीराव ढाकणे यांनी सांगितले.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED