योगाभ्यास निरोगी जीवनाचा मूलमंत्र- बाळासाहेब भोसले

✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर)

अहमदनगर(दि.21जून):-योगाभ्यास हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र असून प्रत्येकानेच आपले दैनंदिन जीवन जगत असताना व्यायाम, योगाभ्यास व प्राणायाम यासाठी वेळ देऊन निरोगी जीवन जगावे असे प्रतिपादन जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ज्येष्ठ शिक्षक,योगाभ्यास तज्ञ, स्काऊट मास्टर बाळासाहेब भिवसेन भोसले यांनी जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ता.नेवासा जि.अहमदनगर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम प्रकार व शारीरिक हालचाली घेऊन योगदिन कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी वज्रासन, ताडासन,वृक्षासन,भुजंगासन,मकरासन, त्रिकोनासन, शवासन, हलासन,धनुरासन आदी असनांबरोबरच, कपालभाती, अनुलोम-विलोम,भश्रीका,ओमकार, शीर्षासन आदी यौगिक क्रिया करून घेतल्या. यावेळी इयत्ता ५वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसह प्राचार्य हरिभाऊ कृष्णाजी जावळे,उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक श्रीकांत कातोरे,समन्वयक प्रा.भाऊसाहेब तांबे,प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.रावसाहेब राशिनकर,ज्येष्ठ शिक्षक अर्जुन वैरागर,राजेश शेंडगे, निलेश म्हसे,प्रा.संदीप बुचकुल, प्रा.दिलीप ससे,प्रा.सुरेंद्र गायकवाड, जालिंदर शेटे,प्रवीण कारले,प्रा.भगवान भाबड,संजय ढेरे,दत्तात्रय कल्हापूरे,अरुण आढाव,गडाख सर ,श्रीमती रुख्मिनी सोनवणे,श्रीमती स्वाती दळवी,श्रीमती फरीदा पठाण,श्रीमती लता थिगळे,श्रीमती शरयू मरडे, श्रीमती प्रिया लहारे, कु.भावना कांबळे, श्रीमती अर्चना लोखंडे, श्रीमती विनया राजगुरू,अश्विनी पिंपळे,यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उस्फुर्त पणे सर्व यौगिक क्रिया,प्राणायम व सूक्ष्म व्यायाम करत योगदिनात सक्रिय सहभाग नोंदवला

लाइफस्टाइल, सामाजिक , स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED