चिमुरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर  प्रतिनिधी)

चिमूर(दि.21जून):-२१ जून जागतिक योग दिन तथा स्वातंत्र्यचा अमृत महोत्सवी वर्ष या पर्वावर चिमूर येथे दि. २१ जून ला सकाळी ५ ते ६.३० या कालावधीत अभ्यंकर मैदान (किल्ल्यावर) येथील खुले सभागृहात पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, महिला पतंजली योग समिती, युवा भारत, पतंजली किसान सेवा समिती तालुका चिमूर, सायकल व पर्यावरण प्रेमी ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.

योगमय जीवनाचा अवलंब करून निरोगी निरामय आयुष्य प्राप्त करण्यासाठी प्रत्येकांनी योग प्राणायाम व व्यायाम अंगिकरावे. चिमुरात सुरू असलेल्या निशुल्क दैनिक योग शिबिरात नियमित जाण्याचे सवय पाडून घेण्याचे आवाहन पतंजली योग समितीचे रमेश कंचर्लावर यांनी प्रास्ताविकेत आवाहन केले. प्रथम पतंजली योग समितीचे फाउंडर मेम्बर मुन्नासेठ असावा, डॉ. संजय पिठाळे, डॉ. गजानन बन्सोड, सायकल व पर्यावरण प्रेमी ग्रुप चिमुरचे केमये, सुनील पोहणकर, रमेश कंचर्लावार यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

व्यासपीठावर निताताई पोहणकर, शक्तीताई बंगारे, पुष्पाताई हरणे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. योग विश्वाला भारताची देण आहे. योग शक्ती अंगिकारल्यास विश्वाचे नक्कीच कल्याण होईल असा आशावाद डॉ. संजय पिठाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायकल व पर्यावरण प्रेमी ग्रुपचे सुनील पोहणकर व त्यांची टीम, डॉ. गजानन बन्सोड, डॉ. संजय पिठाळे, प्रा. राम चिचपाले, कुरडकर, महल्ले, चनोडे, डोलेबांधे, पतंजली योग समितीचे रमेश कंचर्लावार व त्याची टीम, महिला योग समितीचे पुष्पाताई हरणे व त्यांची टीम व महिला योग समितीचे दुर्गाताई सातपुते व त्यांची टीम, लोकेश गोठे यांनी विशेष सहकार्य केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED