भंगाराम तळोधी येथील मका केंद्राला 15 दिवसातच लागले ग्रहण

36

🔹शेतकरीऱ्यांनी मकाच पीक तर घेतले मात्र बाजारपेठ नाही

✒️गोंडपीपरी(नितीन रामटेके,तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी(30जून):- तालुक्यातील भं. तळोधी येथे 1 जून ला मका केंद्राचे खूप थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाला राजुरा विधानसभेचे आमदार श्री. सुभाषजी धोटे व इतर पाहुणे उपस्थित होते. भं. तळोधी येथे मका केंद्र सुरू झाल्याने त्या भागामध्ये येणारे जवळपास 20-25 गावातील शेतकरी खूप आनंदी झाले होते. ‘आता आपल्याला चांगल्या भावात मका पिकाला दर मिळेल’ तसेच आपली मेहनत वाया न जाता माझ्या मेहनतीचं फळ मिळेल म्हणून सर्व शेतकरी आनंदी झाले होते. मात्र फक्त 15 दिवसाच्या आतच त्या मका केंद्राला ग्रहण लागले.

या मका केंद्र 15 दिवसाच्या आतच बंद झाले. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. अनेक शेतकऱ्यांचा माल विकायचं असून आता विकायचं कुठ हा प्रश्न पडला आहे. शेतकरी केंद्राला विचारणा केली असता संपूर्ण माल गोदामामध्ये पडले असून जो पर्यंत हा माल खाली होणार नाही तो पर्यंत तुमच्याकडील माल घेतला जाणार नाही. असे सांगितले जातात. माल घेण्याची शेवटची तारीखही जवळ आली असून, आमच्याकडील मका मालाचे काय होईल असा चिंताजनक प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो, मग आमच्याकडे कोण लक्ष देणार. आमचा विचार कोण करणार, आमच्याकडील मका घेण्यात यावा, नाही तर आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.