‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’-शेतीतुन कार्बन क्रेडीट उत्पन्न मिळण्याची संधी!

277

▪️जेवढे कार्बनचे उत्सर्जन कमी केले त्याचा मोबदला म्हणून त्याच्या आर्थिक परतावा (रक्कम)…….!

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.1जानेवारी):-‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या घोषवाक्याअंतर्गत जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने १० डिसेंबर ते १४ जानेवारी दरम्यान जळगांव येथील जैन हिल्स वर कृषि मोहोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवात विदर्भातील पत्रकारांनी नुकताच सहभाग दर्शविला, त्यातुन शेतीविषय अनेक उपक्रमाबद्दल माहिती मिळाली. ती सामान्य शेतक-यांसह आमचे वाचकांना व्हावी या उद्देशाने सदर माहिती प्रकाशित करण्यात येत आहे- संपादक

जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि हवामान बदल (क्लायमेट चेंज) यामुळे भारतीय शेती व शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. ग्रीनहाऊस गॅसेस, कार्बनडाय ऑक्साईड (सीओ-२), मिथेन (सीएच-४), नायट्रस ऑक्साईड (एन-टू-ओ) व इतर वायुंच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढ होत आहे. या वाढीस मुख्यत्वे विकसीत देश जबाबदार असून विकसनशील व अविकसीत राष्ट्रांना मात्र त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. विकसीत राष्ट्रांकडून त्यांना ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा कार्बनचे उत्सर्जन कमी करता येत नाही. त्यामुळे जी राष्ट्र व क्षेत्रे कार्बनचे हे प्रमाण कमी करतील (१ टन म्हणजे १००० किलो) त्यांना कार्बन क्रेडीट यावे लागते.

कार्बन क्रेडीट याचा अर्थ जेवढे कार्बनचे उत्सर्जन कमी केले त्याचा मोबदला म्हणून प्रमाणपत्र आणि त्याच्या आधाराने आर्थिक परतावा (रक्कम) दिला जातो. त्याला ‘कार्बन क्रेडीट’ असे म्हणतात. हे प्रमाण १ टनाला १ कार्बन क्रेडीट असे आहे.

हे कार्बन क्रेडीट शेतकऱ्यांनाही मिळविण्याची संधी आहे. परंतु एकटा शेतकरी हे कार्बन क्रेडीट मिळवू शकणार नाही. त्यासाठी जैन इरिगेशन कंपनीने या कामात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना कार्बन क्रेडीट मिळवून देण्याची योजना आखली आहे. त्याकरिता सर्व शेतकऱ्यांनी त्यांची माहिती व योजनेत सहभागी होण्यासंबंधीचा लेखी अर्ज भरून देणे आवश्यक आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल शेतकरी कार्बनचे उत्सर्जन कसे कमी करून कार्बन क्रेडीट मिळवू शकतो, याचे सोप्या शब्दात व थोडक्यात उत्तर असे आहे की, जे शेतकरी ठिबक व तुषार म्हणजे सूक्ष्मसिंचन पद्धती वापरतात, ठिबक संचामधूनच पिकांना खते देतात (फर्टिगेशन) आणि अपारंपारिक उर्जेचा (सौर पंप, बायो एनर्जी वगैरे.) वापर करून कोळसा व इतर फॉसिल फ्युअलपासून बनविलेली वीज वापरीत नाहीत. ते कार्बनडाय ऑक्साईड व कार्बनचे उत्सर्जन कमी करतात हे दाखविता येईल.

मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीची लेखी नोंद ठेवून ती कागदपत्रे सादर करावी लागतील. शेतकऱ्याने ही सर्व माहिती जैन वेबसाईटवर नोंदवायची आहे. खरे तर जैन इरिगेशन कंपनीने जी पर्यावरणपूरक उत्पादने निर्माण केली आहेत, त्यांचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या कामात शेतकरी आज अप्रत्यक्षरीत्या सहभागी होऊन योगदान देतच आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते. सिंचनासाठी कमी तास पंपिंग चालवावे लागते. त्यामुळे वीजेचा वापर कमी होतो. म्हणजे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होते. फर्टिगेशन केल्यामुळे म्हणजे ठिबक मधून खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्यामुळे नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण कमी होते. जमिनीची सुपीकता व सकसता जैविक व सेंद्रीय खतांच्या वापराने वाढते. अशी शेती शाश्वत राहते.

शेतकऱ्याला जर कार्बन क्रेडीट मिळवायचे असेल तर ही प्रक्रिया अत्यंत कठिण व गुंतागुंतीची आहे. कारण त्यासाठी अनेक कागदपत्रे तर लागतातच पण शास्त्रीय प्रारूपे (सायंटिफीक मॉडेल्स), माहितीच्या नोंदी, दस्तऐवजांचे संकलन, सल्लागार व त्यांचे मानधन, ऑडीट फी, कागदपत्रांची तपासणी हे सगळे काम अचूकपणे करावे लागते. हे काम करण्याची सर्व जबाबदारी आता जैन इरिगेशन कंपनी उचलणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. फक्त संघटित होऊन जैन इरिगेशन कंपनी बरोबरीने काम करण्याची तयारी ठेवा. या करिता लागणारे सर्व प्रशिक्षण कंपनी शेतकऱ्यांना देणार आहे. मिळविलेल्या कार्बन क्रेडीटचे पैशात रूपांतरण करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता, नोंदणी व इतर कामांसाठी सहकार्य करू. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी मिळविलेल्या कार्बन क्रेडीटचे योग्य मोजमाप होऊ शकेल.

मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या, हे कार्बन क्रेडीट मिळविण्यासाठी व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जैन इरिगेशन कंपनीलाही बरीच मोठी यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यासाठी काही खर्चही येणार आहे. हा खर्च सेवा शुल्क म्हणून गृहीत धरून तो मिळणाऱ्या कार्बन क्रेडीटच्या रकमेतून वजा करून उर्वरीत रकमेतला रास्त वाटा शेतकऱ्यांना दिला जाईल. अर्थात ही रक्कम मिळणे व त्याचे मोजमाप होणे हे मूल्यमापन करणाऱ्या नामांकित संस्थावर अवलंबून आहे. त्यांच्या मोजमापावरून कार्बन क्रेडीट मिळेल की नाही आणि किती मिळेल याची निश्चिती होणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे ती म्हणजे हे कार्बन क्रेडिटचे काम देशात नव्यानेच सुरू झाले असून शेतकऱ्यांना अशा सेवा पुरविणारी जैन इरिगेशन ही देशातली पहिली कंपनी आहे. त्यामुळे आता वेळ दवडू नका. लगेच या योजनेत सहभागी व्हा व कार्बन क्रेडीट मिळण्याची संधी हस्तगत करा.

ही तर केवळ सुरूवात आहेः भविष्यात अशा प्रकारच्या सेवा वॉटर क्रेडीट, ग्रीन क्रेडीट या सुरू होणार असून यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा पुरविण्याकरिता जैन समूह तत्पर आहोत. या संदर्भात अधिक माहितीकरीता टोल फ्रि नं. १८०० ५९९ ५००० किंवा २५७ -२२६०११ वर संपर्क करू शकता.